शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

दारू बाटल्यांची तोडफोड

By admin | Updated: July 11, 2017 00:18 IST

तिडके कॉलनी : महिलांचे दहा तास आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांशी हुज्जत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अपार्टमेंटच्या तळमजल्यावर सुरू होऊ पाहणाऱ्या मद्यविक्रीच्या दुकानाला गेल्या महिनाभरापासून विरोध करणाऱ्या व त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांच्या दारी खेट्या घालूनही न्याय न मिळालेल्या तिडके कॉलनीतील लंबोदर अव्हेन्यूमधील संतप्त महिलांनी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडून तब्बल दहा तास आंदोलन केले. दुकानदार दुकान सुरू करण्यास अडून बसला, तर रहिवाश्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे तिडके कॉलनीत काहीकाळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. लंबोदर अव्हेन्यू या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात तरूण सुखवानी यांनी मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न चालू केल्याची माहिती इमारतीतील सभासदांना मिळाल्यावर त्यांनी त्यास हरकत घेतली व त्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची पंधरा दिवसांपूर्वी भेट घेऊन कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकान सुरू होणार नाही, असे तोंडी आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाला भुललेले इमारतीतील रहिवासी निर्धास्त असताना सोमवारी सकाळी १० वाजता मद्यविक्री दुकानदाराने टेम्पोतून थेट मद्याच्या बाटल्या आणून त्या गाळ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही बाब इमारतीतील रहिवाश्यांच्या लक्षात येताच त्यांनी सामूहिकपणे त्यास विरोध दर्शविला. यावेळी दुकानदार व रहिवाश्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार त्याने सर्व कायदेशीर पूर्तता करूनच दुकान सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले, तर रहिवाशांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डरशी केलेल्या करारात इमारतीत कोणतेही मद्याचे दुकान सुरू करता येणार नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून ताठर भूमिका घेण्यात आल्यामुळे अखेर इमारतीतील महिलांनी दाद मागण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांनी तक्रार करूनही काहीच कार्यवाही का झाली नाही, अशी विचारणा महिलांनी करून धारेवर धरल्यामुळे या ठिकाणी बाचाबाचीही झाली, तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ‘गेट आउट’ म्हणूनही पिटाळून लावल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. रात्री ८ वाजेपर्यंतठिय्या आंदोलनइमारतीच्या खालीच दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्या बाटल्या रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे मिलिंदनगर ते गोविंदनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूकही खंडित झाली. या घटनेचे वृत्त कळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम होते. रात्री ८ वाजेपर्यंत इमारतीतील रहिवाशांनी दुकानासमोरच ठिय्या मांडला.लोकप्रतिनिधींची भेटसकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल घेत आमदार निर्मला गावित, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनीही लंबोदर अव्हेन्यू इमारतीला भेट देऊन रहिवाशांशी संवाद साधला तसेच मद्यविक्री दुकानाला विरोधही दर्शविला. यावेळी बी. आर. पाटील, वीणा चव्हाण, मनीषा धांडे, डॉ. उल्का पिंचा, कल्पना पाटील, डॉ. हेमांगी चौधरी आदी रहिवाशांनी त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार केली. रहिवाशांना दिलासा देण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टातून स्टे आणा, असा सल्ला दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तिडके कॉलनीतील रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बंदोबस्त तैनात केला.