शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

भूमिगत गटार योजनेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:21 PM

नगरपंचायतीच्या आदिवासी गरीब, बेघर वस्तीतील रस्त्याच्या व भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी जागा मालकीच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याने येथील नागरिकांत नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदर बेघर वस्तीत रस्ते व भूमिगत गटार योजनेस मान्यता द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन मुख्यमंत्री व प्रत्येक महसूल विभागीय कार्यालय पातळीवरील कार्यालयाकडे दिले आहे.

ठळक मुद्देनिफाड : मान्यतेसाठी नगराध्यक्षांचे निवेदन; नागरिकांमध्ये नाराजी

निफाड : येथील नगरपंचायतीच्या आदिवासी गरीब, बेघर वस्तीतील रस्त्याच्या व भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी जागा मालकीच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याने येथील नागरिकांत नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदर बेघर वस्तीत रस्ते व भूमिगत गटार योजनेस मान्यता द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन मुख्यमंत्री व प्रत्येक महसूल विभागीय कार्यालय पातळीवरील कार्यालयाकडे दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, निफाड नगरपंचायतीने शासनाने मंजूर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ठोक अनुदानातून गट नं. ३४५ अ व ३४५ ब या सरकार व बेघर झोपडीकडे असा आशयाचा सातबारा असलेल्या जागांवरील नागरिकांसाठी रस्ते व भूमिगत गटार बांधण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी २०१९ मध्ये पाठविला होता.जवळपास ११ महिन्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर रस्ते व भूमिगत गटारी ज्या जागेत करावयाच्या आहेत ती जागा नगरपंचायतीच्या मालकीची नसल्याने सदर कामे करण्यास असमर्थता दर्शविली. नगरपंचायतीने याच प्रस्तावात गट नं. ३२९ ही वनखात्याची जागा आहे. त्यातील वनहक्क कायद्यानुसार मिळालेल्या जमीनधारकांना रस्ते व गटारी करण्याचा प्रस्ताव होता.भूमिगत गटार योजनेबाबत वनखात्याचा ना हरकत दाखला मागितला. वनखात्याच्या नियमाप्रमाणे प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय परवानगी मिळत नाही. यामुळे महसूल व वनखात्याच्या विसंवादाचा परिणाम म्हणून मूलभूत सोयी सुविधांचा लाभ आदिवासी व गरीब बांधवांना मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Governmentसरकार