शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

देवगांव परिसरात जनावरांच्या लसीकरणाला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

देवगांव : ऐन पावसाळ्यात पशुधन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे देवगांव परिसरातील पशुधनाचे लसीकरण खोळंबले असून पशुपालकांमध्ये चिंतेचे ढग ...

देवगांव : ऐन पावसाळ्यात पशुधन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे देवगांव परिसरातील पशुधनाचे लसीकरण खोळंबले असून पशुपालकांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. पावसाळापूर्व जनावरांना फऱ्या व घटसर्प या साथीच्या आजारांवर दरवर्षी लसीकरण केले जाते. मात्र, फऱ्या व घटसर्प रोगांवर उपायकारक लसीचा साठा आला नसल्याने देवगांव परिसरातील जनावरांचे लसीकरण लांबले आहे.

जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यासारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्पसारखे श्‍वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते. खालच्या जबड्याखाली सूज येते. श्वासोच्छवास करायला त्रास होतो. जनावराला १०४ ते १०५ अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी ९० टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात. फऱ्या हा जनावरांना, प्राण्यांना तसेच विशेषत: दुधाळ जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग असून सांसर्गिकजन्य रोग आहे. विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो. हा रोग ‘क्लोस्टिडियम शोव्हिया’ या विषाणूंमुळे होतो.

साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांना फऱ्या व घटसर्प आजारांवर लसीकरण केले जाते. वर्षातून दोनदा लसीकरण करणे गरजेचे असते. मात्र, पशुसंवर्धन विभागाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी जून महिन्याच्या दरम्यान या आजारांवर लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर यावर्षी कुठल्याही प्रकारचे लसीकरण न झाल्याने जनावरांमध्ये फऱ्या व घटसर्प आजाराचा संसर्ग वाढून जनावरांमध्ये फऱ्या आणि घटसर्प आजाराची लागण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे काम असून वेळेवर लसीकरण करण्याची मागणी पशुपालक करीत आहेत.

--------------------

पशुवैद्यकीय सेवा वाऱ्यावर...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात डहाळेवाडी व देवगांव येथे पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आहेत. मात्र, या दोन्ही दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात एकमेव पशुधन अधिकारी आहे. एकाच डॉक्टरांकडे अतिरिक्त भार असल्यामुळे दोन्ही कार्यक्षेत्रावर लक्ष देण्यावर तारांबळ उडते. परिणामी पशुधन डॉक्टरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर उपचाराअभावी जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देवगांव परिसरासाठी एक वेगळ्या पशुधन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

▪️त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनावरांची एकूण आकडेवारी...

शेळ्या -मेंढ्या | १७३२३

बैल-गाई | ४२६४०

म्हशी-रेडे | १०१२७

---------------------

प्रतिक्रिया...

जनावरांना डिसेंबर महिन्यामध्ये लस देण्यात आली आहे. मात्र, मे महिन्यात होणाऱ्या लसीकरणासाठी लस अजून उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण थांबले आहे. फऱ्या व घटसर्प आजारांवरील लस उपलब्ध होताच लगेचच जनावरांना लसीकरण करण्यात येईल.

- डॉ. विजय भोये, पशुधन पर्यवेक्षक, देवगांव.