शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

चालु महिन्यात खा रेशनच्या मक्याची रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 17:45 IST

नाशिक जिल्ह्यात मका पिकविला जात असला तरी, नैसर्गिक व भौगोलिक विचार करता मका खाल्ला जात नाही, शिवाय आदिवासी भागातील जनतेचे भात व नागली हेच प्रमुख अन्न आहे अशा परिस्थितीत रेशनमधून दिला जाणारा मका शिधापत्रिकाधारक घेतील काय याविषयी पुरवठा खातेच साशंक आहे, मात्र ते काहीही असले तरी, चालू महिन्यात शासनाने सांगितल्याप्रमाणे सर्वांना मक्याची रोटी खाण्याशिवाया पर्यायच शिल्लक नाही.

ठळक मुद्देगव्हात कपात : दुकानदारांना विक्रीची सक्ती धान्य गुदामामध्ये गेल्या वर्षभरापासून पडून असलेला मका खपविण्यासाठी

नाशिक : धान्य गुदामामध्ये गेल्या वर्षभरापासून पडून असलेला मका खपविण्यासाठी अन्न व पुरवठा मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात रेशनमधून दिल्या जाणा-या गव्हात कपात करून त्याऐवजी मका विक्री करण्याची सक्ती रेशन दुकानदारांवर केली असून, पुरवठा खात्याने दुकानदारांना चलन भरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे चालू महिन्यात गोरगरिबांना शासन कृपेने मक्याची रोटी खावी लागणार आहे.गेल्या वर्षी राज्य सरकारने आधारभुत किंमतीत राज्यातील विविध भागातून मक्याची खरेदी केली होती. त्यासाठी मका उत्पादकांना १३६५ रूपये प्रति क्विंटल दर देण्यात आल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३८ हजार क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. हा मका सध्या काही ठिकाणी शा सकीय गुदामांमध्ये तर काही ठिकाणी खासगी गुदामे भाड्याने घेऊन ठेवण्यात आला आहे. वर्षभरापासून पडून असलेल्या मक्याची गुणवत्ता व दर्जा खराब होऊ लागला असून, काही ठिकाणी कीड लागण्याच्या घटना घडत असल्याने त्याच बरोबर यंदाही पुन्हा शासन आधारभुत किंमतीत मका खरेदी करणार असल्याने या मक्याच्या साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. एक रूपये किलो दराने हा मका देण्यात येणार असून, शिधापत्रिकाधारकांना तो सक्तीने घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना दिल्या जाणा-या गव्हामध्ये कपात करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्राधान्य कुटुंबांना प्रत्येक पाच किलो धान्य दिले जाते, त्यात आता एक किलो मका दिला जाईल तर अंत्योदय व अन्नपुर्णा योजनेत मिळणा-या ३५ किलो धान्यापैकी चार किलो मका घ्यावा लागणार आहे.नाशिक जिल्ह्यात मका पिकविला जात असला तरी, नैसर्गिक व भौगोलिक विचार करता मका खाल्ला जात नाही, शिवाय आदिवासी भागातील जनतेचे भात व नागली हेच प्रमुख अन्न आहे अशा परिस्थितीत रेशनमधून दिला जाणारा मका शिधापत्रिकाधारक घेतील काय याविषयी पुरवठा खातेच साशंक आहे, मात्र ते काहीही असले तरी, चालू महिन्यात शासनाने सांगितल्याप्रमाणे सर्वांना मक्याची रोटी खाण्याशिवाया पर्यायच शिल्लक नाही.

टॅग्स :agricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय