शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी मुलीची शिक्षणाची ओढ

By admin | Updated: August 31, 2014 00:53 IST

धाडसी मुलीची शिक्षणाची ओढ

 पंचवटी -शाळा म्हटली की, अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात खड्डा पडतो; मात्र याच शाळेसाठी बारा वर्षांची चिमुकली चक्क परभणीहून नाशिकला एकटी रेल्वेने दाखल झाल्याची घटना पंचवटीत घडली. या धाडसी मुलीची शिक्षणाची ओढ अनेकांना बरेच काही ‘शिकवून’ गेली. सोनाली माणिक निरवळ हिची ही गोष्ट. तिचे आई-वडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करतात. सोनालीला आणखी दोन बहिणी. पंचवटीतील फुलेनगरच्या महापालिका शाळा क्रमांक ६७ मध्ये या तिघी शिकत होत्या. सोनाली व मोना या दोघी चौथीत, लहान बहीण राणी दुसरीत शिकत होती. सोनाली अभ्यासात अत्यंत हुशार; मात्र आठवडाभरापूर्वीच वडिलांची तब्येत बिघडल्याने हे कुटुंब आपले मूळ गाव असलेल्या परभणीतील सेवकनगर येथे निघून गेले. तेथे दोन-तीन दिवसांनी सोनालीला शाळेची आठवण येऊ लागली. तिने अर्धा तास पायपीट करून रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेने ती नाशिकला पोहोचली. या लांबच्या प्रवासात एकाने सोनालीला पाहून ‘तू कोठे चालली?’ अशी विचारणा केली. तेव्हा सोनालीने ‘नाशिकला शाळेत चालल्याचे’ सांगितले. त्यावर त्याने तिला पंधरा रुपये दिले. सोनालीने हे पैसे खर्च केले नाहीत. नाशिकरोडला उतरल्यावर तिने पंचवटी बस पकडली अन् मैत्रिणीच्या घरचा रस्ता धरला.सोनाली अचानक दिसेनाशी झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शेजारी राहणाऱ्या मुलाने तिने नाशिकला जाण्याची माहिती विचारल्याचे सांगितले. त्यावर सोनालीच्या आईने नाशिकला तिच्या शिक्षकांना ही बाब फोनवरून कळविल्यावर शिक्षकांनी शोधाशोध सुरू केली. सोनाली सुखरूप मिळाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सोनालीची आई मीरा यांनी तातडीने नाशिक गाठले अन् सोनालीला कवटाळले या क्षणाने उपस्थितही गहिवरले. सोनालीला शाळा व परिसर विकास समितीने रोख ३ हजार रुपयांची मदत केली. पहिलीपासून मनपाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सोनालीला शाळेची ओढ लागली होती. (वार्ताहर)