शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

औंदाणे येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

By admin | Updated: July 19, 2016 00:12 IST

विरजण : विहिरीचे पाणी पाहताना दुर्घटना

सटाणा : चांगला पाऊस झाल्याने वर्षानुवर्षे कोरड्या असलेल्या विहिरीत दोन दिवसांपूर्वी सुमारे ३० फूट पाणी आले. त्या आनंदात विहिरीला आलेलं पाणी पाहण्यासाठी बापलेक विहिरीजवळ गेले. धूळ खात पडलेला विद्युतपंप चालू होतो की नाही याची वडील खात्री करत असतानाच मुलगा अचानक विहिरीत पडून बुडाला. मुलगा विहिरीत पडल्याचे पाहताच वडिलांनाही चक्कर आली आणि तेही जमिनीवर कोसळले. विहिरीला अनेक वर्षांनी आलेल्या पाण्याचा आनंद क्षणिक ठरला.तालुक्यातील औंदाणे येथील प्रगतिशील शेतकरी किशोर सुखदेव खैरनार यांची हत्ती नदीजवळ विहीर आहे. वर्षानुवर्षे कोरड्या असलेल्या या विहिरीला मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने चक्क तीस फुटापर्यंत पाणी आले. विहिरीला पाणी आले म्हणून अत्यानंद झालेले किशोर खैरनार रविवारी आनंदाच्या भरात त्यांच्या १५ वर्षीय मुलगा प्रशांतलाही पाणी पाहण्यासाठी विहिरीजवळ घेऊन गेले. अनेक वर्षांपासून बंद असलेला विद्युतपंप चालू होतो की नाही याची खात्री करत असताना विहिरीतले पाणी पाहत असलेल्या प्रशांतचा अचानक तोल जाऊन तो विहिरीत कोसळला. तब्बल दीडशे फूट खोल असलेल्या विहिरीत प्रशांत पडल्याचे समजताच वडील गर्भगळीत होऊन चक्कर आल्याने जमिनीवर कोसळले. परिसरात पेरणी करीत असलेल्या शेतकऱ्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी विहिरीजवळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत प्रशांतची प्राणज्योत मालविली होती. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोहणाऱ्या एका व्यक्तीला विहिरीत उतरविले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या ह्रदयद्रावक घटनेने औंदाणे गावावर शोककळा पसरली आहे. प्रशांत सटाणा येथील मराठा हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता. (वार्ताहर)