शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीच्या वादात पूल अंधारात

By admin | Updated: April 24, 2017 01:53 IST

नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे

 नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे. दोन्ही बाजूंनी रस्त्याला उतार असून, नवीन रस्ता असल्यामुळे वाहतुकीचा वेगही वाढल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहेमहापालिका प्रशासनाकडे वारंवार ‘स्मार्ट’ तक्रार करूनदेखील या पुलावरील पथदीप अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाही; मात्र ‘स्मार्ट अ‍ॅप’वर प्राप्त तक्रार तत्काळ ‘क्लोज’ करण्यात येते, असे एका जागरूक नागरिकाने सांगितले आहे. एकूणच ज्याप्रमाणे पथदीप बंद आहे त्याचप्रमाणे स्मार्ट तक्रारदेखील दखल न घेता बंद केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पुलावर गेल्या दोन महिन्यांपासून अंधार पसरला आहे; मात्र केवळ महापालिकेच्या पूर्व व पंचवटी विभागाच्या हद्दीमुळे अद्याप या पुलावरील पथदीपांची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. पूर्व विद्युत विभागाकडून सदर पूल पंचवटीच्या हद्दीत असल्याचे सांगितले जाते तर पंचवटी विद्युत विभागाकडून पुलाचा भाग पूर्वच्या हद्दीत समाविष्ट असल्याचे कळविले जाते. एकूणच नेमका पूल कोणाच्या हद्दीत हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा ‘पूल’ तयार होणे गरजेचे असून, तातडीने पूर्व किंवा पंचवटी दोन्हीपैकी कोणीही पुढाकार घेऊन बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.औरंगाबाद महामार्ग ते टाकळीमार्गे पुणे महामार्गाला जोडणारा हा रिंगरोड सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आला. या रस्त्यावर वाहतूकही वाढली असून, लहान-मोठ्या अवजड वाहनांसह शेतकऱ्यांची या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करताना रस्त्यावरील मुख्य पुलाचा परिसर अंधारात बुडालेला असतो. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचा वेग अधिक असतो व वाहने जवळ येईपर्यंत नजरेस पडत नाही. महापालिकेने या पुलावरील बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)