शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला गोदावरीत दोघे बुडाले

By admin | Updated: August 11, 2014 00:51 IST

नाशिकरोडला गोदावरीत दोघे बुडाले

 

नाशिकरोड : जेलरोड टाकळीरोड येथील आढाव मळ्याजवळ सायंकाळी गोदावरी नदीकिनारी फिरण्यास गेलेल्या विद्यार्थ्यासह वसतिगृहाचा व्यवस्थापक असे दोघेजण नदीपात्रात वाहून गेल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़ येथील गुड शेफ र्ड होम वसतीगृहातील विद्यार्थी आकाश अशोक गायकवाड (१५), मूळ रा़ भांडूप, मुंबई व वसतिगृहाचे व्यवस्थापक मुकेश अंबादास हिवराळे (३१), मूळ रा़ अमरावती यांचा यामध्ये समावेश आहे़ याबाबत पोलीस व प्रत्यक्षदर्शींकडून समजलेल्या माहितीनुसार या वसतिगृहातील मुले व व्यवस्थापक हे दर रविवारी सायंकाळी जवळील गोदावरी नदीकिनारी फि रण्यासाठी जात असत़ आज सायंकाळी नेहमीप्रमाणे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मुकेश हिवराळे हे वसतिगृहातील १५ मुलांसमवेत टाकळीरोड आढाव मळ्याजवळील नदीकिनारी गेले होते़ तेथे नवीन पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे़ ते फि रत असताना आकाश गायकवाडचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडून गटांगळ्या खाऊ लागला़ यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या आरडाओरडीमुळे हिवराळे यांनी पाण्यात उडी घेतली़ परंतु पाण्याला खोली व तीव्र प्रवाह असल्याने ते दोघेही पाण्यात वाहून गेले़ उर्वरित विद्यार्थ्यांनी आरडाओरड करत बाजूच्या नागरिकांना सदर घटना सांगितल्यावर नागरिकांनी उपनगर पोलीस तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती दिली़ त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांचा शोध सुरू केला; मात्र उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता़