शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

By admin | Updated: September 16, 2014 00:22 IST

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

 

सटाणा : शहरालगतच असलेल्या यशवंतनगर येथील स्टेट बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून दोघांना अटक करण्यात यश मिळविले. मात्र चार दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. हा प्रकार रविवारी मध्यरात्री २ वाजता घडला. पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल शीतल गायकवाड व पोलीस वाहनचालक बापू नेरकर हे रात्री गस्तीला यशवंतनगर परिसरात आले असता त्यांना भारतीय स्टेट बँकेजवळ अंधारात काही इसम संशयास्पदरीत्या आढळून आले. चौधरी यांनी त्यांना हटकले असता अंधाराचा फायदा घेत त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.कैलास चौधरी यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला आणि अक्षय संपत जाधव (रा.मावडी, ता. दिंडोरी) सुनील रमेश सुराशे (रा. हिवरखेड, ता. सिन्नर) यांना पकडले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे चाकू, पोगर आणि मिरची पूड मिळून आली. फरार झालेल्या इतर चौघांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे व पोलीस निरीक्षक भागवत जायभाये व कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढत मुख्य मार्गांवर नाकाबंदी केली मात्र त्यांना यश आले नाही. दोन्ही आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी दरोड्यासाठीच परिसरात आल्याची कबुली दिली असून, पोलिसांच्या तत्परतेने मोठी विपरीत घटना टळल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. इतर चार आरोपींना लवकरच अटक करून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)’ नाशिक : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ विशाल शिवाजी कामडी (३२, गुलमोहोर कॉलनी, सातपूर) यांनी आपली हीरोहोंडा दुचाकी जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये लावलेली होती़ पंचवीस हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली़