शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

गावठी कट्टा बाळगणाऱ्या जळगावच्या दोघांना अटक

By admin | Updated: August 8, 2016 23:37 IST

अंबड-लिंकरोड : तीन दिवस पोलीस कोठडी

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात गावठी कट्टा हाताळताना गोळी सुटून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहरातील खडकाळी परिसरात गावठी कट्टा व काडतुसे बाळगणाऱ्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ हे दोन्ही संशयित जळगाव जिल्ह्यातील असून, त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ खडकाळी सिग्नल परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन दोन संशयित येणार असल्याची माहिती युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक एऩ एऩ मोहिते यांना मिळाली होती़ त्यानुसार रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता़ येथील देशी दारू दुकानाच्या समोर उभे असलेले संशयित दीपक साईदास राठोड (३५, रा. त्रिमूर्ती निवास, गजानन कॉलनी, चाळीसगाव, जि. जळगाव) व नीलेश भगवान चंदनशिव (३४, रा. संजय गांधीनगर, स्टेशन रोह, रवि कॉलेजसमोर, चाळीसगाव, जि. जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले़.  या दोघा संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गावठी कट्टा कोठून खरेदी केला याची चौकशी करीत आहेत़ (प्रतिनिधी)