शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: March 10, 2017 01:33 IST

सटाणा/वीरगाव : विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ताहाराबाद या गावाजवळ डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटरसायकलला धडक दिल्याने यात वीरगाव येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला

 सटाणा/वीरगाव : विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ताहाराबाद या गावाजवळील हॉटेल साईगार्डन समोर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटरसायकलला भीषण धडक दिल्याने यात वीरगाव(ता. बागलाण) येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.अंतापुर येथून कंदोरी कार्यक्र म आटोपून परत येत असतांना गुरु वारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीरगाव परिसरावर यामुळे शोककळा पसरली आहे.वीरगाव येथील हरीभाऊ शिवराम गांगुर्डे (६५) व पवन शिवानंद मोरे (३०) हे सकाळी अंतापुर येथे कंदोरीच्या कार्यक्रमासाठी मोटर सायकलीने गेले होते. कार्यक्र म आटोपुन दुपारी घराकडे परतत असतांना ताहाराबाद या गावाजवळ असलेल्या हॉटेल साई गार्डनसमोर या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या टँकर(एम.एच.३९ सी २४२२) ने भीषण धडक दिली. यात मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर पवन मोरे व हरी गांगुर्डे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दु:खापत झाली. परिसरातील नागरिकांनी या दोघांना तात्काळ रु ग्णवाहिकेद्वारे सटाणा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. हरी गांगुर्डे हे वीरगाव येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. तर पवन हा अविवाहित आहे. यानंतर संपूर्ण परिवाराची धुरा पवन संभाळत असतांनाच पवनच्या अपघाती जाण्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसून आले आहे.जायखेडा येथील पोलिस ठाण्यात सदर वाहनाविरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजियसंग ठाकुर करीत असून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनास ताब्यात घेतले आहे. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वीरगाव येथे दोन्हीही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापारी वर्गाने आपले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. (वार्ताहर)