शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत दोघे उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:02 IST

नाशिक : भारतीय लोकशाही व निवडणूक पद्धतीबाबत शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परिक्षेत नाशिक जिल्ह्यातील दोघे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, आगामी काळात या दोघा विद्यार्थ्यांची निवडणूक जनजागृती मोहिमेसाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नेमणूक केली जाणार आहे. नव मतदारांमध्ये लोकशाही मुल्ये व गुप्त मतदान पद्धतीची माहिती या माध्यमातून ...

ठळक मुद्देब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर : विद्यार्थ्यांमध्ये करणार जनजागृतीस्पर्धा परिक्षेची पहिली फेरी घेतली असता त्यासाठी २९५३ विद्यार्थी परिक्षेला बसले

नाशिक : भारतीय लोकशाही व निवडणूक पद्धतीबाबत शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परिक्षेत नाशिक जिल्ह्यातील दोघे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, आगामी काळात या दोघा विद्यार्थ्यांची निवडणूक जनजागृती मोहिमेसाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नेमणूक केली जाणार आहे. नव मतदारांमध्ये लोकशाही मुल्ये व गुप्त मतदान पद्धतीची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.आदित्य दत्तात्रय बैरागी (वैनतेय विद्यालय, निफाड) व वडजे प्रदीप पुंडलिक (बी. के. कावळे विद्यालय, राजाराम नगर ता. दिंडोरी) असे या दोघा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे असून, ते अनुक्रमे दहावी व अकरावीत शिक्षण घेत आहेत. भारत निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाही व्यवस्था व तिच्यासाठी पुरक ठरणाºया मतदान पद्धतीविषयी शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने देशपातळीवर इयत्ता ७ वी ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान चाचणी परिक्षा घेण्याचे जाहीर केले होते. विशेष करून मतदान पद्धती, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीचा काळ, मतदानासाठी पात्र ठरणारी व्यक्ती, उमेदवारासाठी पात्र ठरणारी व्यक्ती, संसदेची सदस्य संख्या, विधानसभेचा कालावधी अशा विविध प्रकारचे सुमारे ३९ प्रश्न त्यासाठी बहुपर्यायी तयार करण्यात आले होते. या परिक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात या स्पर्धा परिक्षेची पहिली फेरी घेतली असता त्यासाठी २९५३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यात पहिल्या तीन क्रमांकात ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या ७४ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर द्वितीय स्पर्धा परिक्षा २८ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे घेण्यात आली असता त्यातून आदित्य बैरागी व प्रदीप वडजे हे दोन विद्यार्थी ४८ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने ते आता राज्यस्तरीय परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत.स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अलिकडेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेस भेट देवून निवडणूक कार्यालयात चालणाºया कामकाजाची माहिती घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ व तहसिलदार गणेश राठोड यांनी त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय