शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी जाळपोळ प्रकरणी दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:50 IST

पांडवनगरी परिसरात सोसायटीच्या वाहनतळात प्रवेश करून सर्रासपणे नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयितांच्या वडाळागावातून मुसक्या आवळल्या आहेत.

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात सोसायटीच्या वाहनतळात प्रवेश करून सर्रासपणे नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघा संशयितांच्या वडाळागावातून मुसक्या आवळल्या आहेत. आकाशआरंभ सोसायटीच्या परिसरात नशा करण्यापासून दोघा संशयितांना रहिवाशांनी रोखल्याने त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.पंधरवड्यापूर्वी पांडवनगरी परिसरातील आकाशआरंभ सोसायटीत राहणारे अजय उपासणी यांच्या मालकीच्या दोन दुचाकी सोसायटीच्या वाहनतळात रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पेटवून पळ काढला होता.गुन्हे शाखेच्या युनिट-२चे पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित सोनार, उपनिरीक्षक विजय लोंढे, युवराज पाटील, श्रीराम सपकाळ, प्रमोद दराडे, अन्सार सय्यद आदींनी वडाळागावातून शनिवार (दि.१३) रोजी संशयित आरोपी गणेश जडबुले (२५, रा. रामोशीवाडा), उत्तम साळवे (२४, रा. राजवाडा) यांना अटक केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक