सातपूर : राष्ट्रीय सुरक्षा परिषद महाराष्ट्र शाखा आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय बेस्ट प्रॅक्टिसेस अॅवॉर्ड २०१५ स्पर्धेत नाशिकच्या बॉश (मायको) कंपनीला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.पुण्यातील बालेवाडी येथील हॉटेल आॅर्किडमध्ये ५ ते ८ आॅक्टोबरदरम्यान राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील इंजिनियरिंग, रासायनिक, औषध, पेट्रोलियम, खत, बांधकाम, सीमेंट, अन्नप्रक्रिया या विद्युत, प्लास्टिक अशा १२० उद्योगांचा समावेश होता. यावेळी कारखान्यातील प्रतिनिधींनी आपापल्या कारखान्यातील सर्वोत्तम सुरक्षा उपाययोजनांची माहिती सादर केली होती. बॉश कंपनीच्या वतीने सुरक्षा (सेफ्टी) अधिकारी कौशिक गांधी आणि गोकुळ सोनवणे यांनी कंपनीतील सुरक्षा उपाययोजनांचे सादरीकरण केले होते. शनिवारी पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे कामगार व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव बलदेवसिंग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक जे. बी. मोटघरे, अरविंद जोशी, एस. एल. चौधरी, नाशिक विभागाचे सहसंचालक मधुकर प्रभावळे, उपसंचालक राम दहिफळे आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिंद्र अॅन्ड महिंद्र कांदिवली (प्रथम) बॉश मायको, नाशिक (द्वितीय), ईटॉन, पुणे (तृतीय) उत्तेजनार्थ महिंद्र अॅन्ड महिंद्र नाशिक व इगतपुरी या कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी नाशिकचे राहुल शिरवाडकर, नॉबर्ट डिसूझा, सचिन मोरे, प्रसाद सरोदे, राजेंद्र दुसाने, वसंत मुळे, नगरसेवक शशिकांत जाधव, निवृत्ती लोखंडे आदिंसह विविध कारखान्यांतील अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
‘बॉश’ला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
By admin | Updated: October 31, 2015 22:10 IST