शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

‘महाबली’चा भल्या सकाळी उच्छाद

By admin | Updated: October 13, 2015 22:58 IST

राजकीय वरदहस्त : पोलीस बघ्याच्या भूमिकेत

नाशिक : वेळ साधारणत: सकाळी सात ते आठच्या दरम्यानची असावी, शेकडो वाहनांचा ताफा कर्णकर्कश भोंगे वाजवत मुख्य रस्त्यावरून बेफामपणे धावत होता, कोणी वाहनाच्या खिडकीतून निम्मे अंग बाहेर काढलेले, तर काहींनी वाहनाच्या टपावरच बसकन मारलेली, मालमोटारीच्या बंपरवर जीवघेणी कसरतीत काही गुंतलेले, हातात भगवा ध्वज व तोंडातून नावालाच जयघोष, घोषणा मात्र न ऐकवणाऱ्या.. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी व वाहनांचा ताफा पाहून पादचाऱ्यांची उडालेली धावपळ....पण त्यांना ना धाक होता ना कसली भीती.मंगळवारी नवरात्रोत्सवाची सुरुवात झाल्याने त्यानिमित्त पहाटेपासून देवीभक्त भाविकांची शहराच्या प्रमुख रस्त्यांवर बऱ्यापैकी वर्दळ असतानाच शहराच्या कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड या प्रमुख मार्गावरून स्वत:ला ‘महाबली’चे भक्त म्हणवून घेणाऱ्या व राज्यात सत्तांतर झाल्याने जणू काही ‘शिवशाही’ अवतरली अशा अविर्भावात रस्त्यावर उतरलेल्या या ‘युवा’ प्रतिष्ठानने प्रचंड धुडगूस घातला. रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने हाकतानाच जोर जोरात हॉर्न वाजविणे, तोंडात पिपाण्या धरून त्या मोठ्याने वाजविणे, अधून-मधून घोषणा देणे व प्रसंगी आडवे येणाऱ्यांचा पूर्वजांचा उद्धार करण्याचे काम बिनदिक्कतपणे करण्यात आले. शेकडो वाहने एकाच वेळी रस्त्यावर उतरल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा तर झालाच, परंतु काही ठिकाणी चौफुल्यांवर मुद्दामहून वाहने उभी करून स्वत:ला ‘महाबली’ म्हणवून घेणाऱ्यांनी रस्त्याने पायी जाणाऱ्यांची छेड काढण्याचाही प्रकार केला. भल्या सकाळी प्रचंड गोंगाटात नसत्या शक्तीचे प्रदर्शन करीत फिरणाऱ्यांना अटकाव करण्याची हिम्मत पोलीस यंत्रणेलाही झाली नाही. अर्थात तशीही ती होणे शक्यच नव्हते कारण सातपूरच्या श्रमिकनगरातून शेकडो वाहनांतून सप्तशृंगी देवीच्या दर्शनाचा ‘विक्रम’करण्यासाठी निघालेल्या या टोळक्यांचा हा उपद्रव होता. राज्यात झालेले सत्तांतर व भाजपाच्या मंत्री-पदाधिकाऱ्यांचा कथित आशीर्वाद असल्याचा संबंधितांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे पोलिसांचेही हात थिटे पडणे साहजिकच होते, फरक इतकाच होता ज्यांच्या नावे हा सारा उन्माद केला गेला, त्याचा पूर्वेतिहासही गुन्हेगारीचा असल्यामुळे चांगल्याची अपेक्षा ठेवणे ही नाशिककरांची चूकच म्हणावी लागेल.