शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या तालुक्यात बोअरवेलचा धडाका

By admin | Updated: June 1, 2016 00:04 IST

धरणांच्या तालुक्यात बोअरवेलचा धडाका

 वणी : विहिरी खोदण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या फायद्याचे गणितवणी : धरणांचा तालुका म्हणून परिचित असणाऱ्या दिंडोरी तालुक्यात पाच हजारपेक्षा जास्त बोअरवेल आहेत. विहिरी खोदण्यापेक्षा बोअरवेल खोदणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांचा कल विहिरीपेक्षा बोअरवेलकडे अधिक असल्याचे पाहणीत आढळून आले आह़े विहिरीच्या पाण्यात अधिक क्षार असल्याच्या भावनेने शेतकऱ्यांनी बोअरवेलला अग्रक्रम दिला आहे. दिंडोरी तालुक्यात ओझरखेड, पुणेगाव, करंजवण, पालखेड, वाघाड, तिसगाव एकलहरा अशी सात धरणे व लघुपाटबंधारे, सिमेंट प्लग बंधारे याद्वारे पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था आहे. पाण्याच्या स्त्रोतांपैकी धरणातून पिण्याचे पाणी व काही धरणांतून औद्योगिक वापर वगळता पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून शेतजमिनीसाठी पाणी वापराची तरतूद आहे. दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घेण्यात येते, त्यापाठोपाठ टमाटा, भाजीपाला, ऊस अशा उत्पादनांना पाण्याची मोठी गरज भासते. शेतीसाठी उपलब्ध होणारे कर्ज, वाढते बागायती क्षेत्र व नवनवीन उत्पादने घेण्याचा कल याचा समन्वय पाणी वापराशी साधताना शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. शेतीला व्यवसायाचे स्वरूप आले असून या दृष्टिकोनामुळे शेती व्यवसाय एक आव्हानात्मक बाब ठरू लागली आहे. हा व्यवसाय फुलविण्यासाठी पाणी हा आवश्यक घटक आहे. त्यामुळे बोअरवेलच्या पाणीवापराकडे उत्पादकांचा कल वाढतो. द्राक्ष शेतीबरोबर इतर उत्पादनासही क्षारयुक्त पाणी मारक असल्याच्या भीतीमुळे बोअरवेलची संख्या वाढली आहे. त्यात बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य असल्याने ही बाबही संख्येत वाढ करण्यास कारणीभूत आहे. तीनशे फुटापर्यंत बोरिंग केल्यास वीस हजाराच्या जवळपास खर्च येतो. के सिंग पाइप पाच ते सातहजार, मोटार पाइप केबल व तत्सम खर्च तीस हजारांच्या पुढे येतो. आठ ते दहा तासांच्या अंतराने बोअरवेलमधून पाणी उपलब्ध होते, याउलट विहिरीसाठी तुलनात्मकरीत्या अधिक खर्च येतो व खोदकामास कालावधी जास्त लागतो दरम्यान पाणीवापराविषयी जनजागृती, पावसाचे पाणी साठविण्याचे कौशल्य या बाबींचा सकारात्मक विचार बोअरवेलच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यास साहाय्यभूत ठरू शकतो. (वार्ताहर)