शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील गरिबांना मायेची ऊब़़

By admin | Updated: December 28, 2015 22:20 IST

उपक्रम : मानव उत्थान मंचतर्फे गरिबांना कपड्यांसह ब्लँकेट वाटप

नाशिक : नाताळमध्ये सांताक्लॉज गुपचूप येतो अन् भेटवस्तू देऊन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवितो़ नाताळच्या पूर्वसंध्येला शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना मानव उत्थान मंचमधील कार्यकर्त्यांच्या रूपाने आधुनिक सांताक्लॉजच भेटले़ या सांताक्लॉजनी जीव गारठून टाकणाऱ्या कडाक्याच्या थंडीमध्ये या गरिबांना उबदार कपडे आणि ब्लँकेट वाटप करून गुरुवारी मायेचे पांघरून घातले आहे़शहरात अनेक दिवसांपासून मानव उत्थान मंचचे सहकारी शहरातून कपडे व ब्लँकेट जमा करण्याचे काम करीत होते़ शहरातील पाच सेंटरच्या माध्यमातून मंचच्या कार्यकर्त्यांनी हे जमा केलेले कपडे गुरुवारी शहरातील रस्त्यांवर राहणाऱ्या गरिबांना वाटप करण्यात आले़ रुग्णालयाबाहेर राहणारे, अमरधामपासून तर रामकुंडापर्यंत राहणारे, द्वारका उड्डाणपुलाच्या खाली राहणारे, पपया नर्सरीजवळील रस्त्यावर राहणाऱ्या गरीब नागरिकांना हे कपडे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले़मानव उत्थान मंचतर्फे सुमारे ६२० नागरिकांना कपडे, तर १५० महिला व वृद्धांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले़ या उपक्रमात मानव उत्थान मंचचे जय शिवरामन, जसमित सेहमी, जकिया शेख, जगबीर सिंग, हरप्रित सिंग, नितीन शुक्ल,अश्पाक ताहेरी, आदित्य त्रिपाठी, आकाश शर्मा, पंकज जोशी, सचिन बुरकुले, अंगद सिंग, अनिल सिंग यांच्यासह आठवीपासून ते बारावीच्या मुलांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)सामाजिक जाणिवेतून रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना आम्ही उबदार कपडे व ब्लँकेट वाटप केले़ विशेष म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कोणीही ख्रिश्चन धर्मिय नाही़ येत्या १ जानेवारीला पुन्हा हा कार्यक्रम केला जाणार असून, कपडे दान करण्यासाठी संपर्क साधावा़ - जगबीर सिंग, मानव उत्थान मंच