नाशिक : बीए लोकसेवा परीक्षेतील गोंधळ अजूनही कायम असून, आता तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही पुस्तकाविनाच परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. बीए लोकसेवा प्रथम वर्ष वर्गाच्या पहिल्या पेपरला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारण्यात आल्याचा अनुभव लक्षात घेता तृतीय वर्षाच्या परीक्षेतही असाच गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुक्त विद्यापीठ आणि पुण्याच्या चाणक्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बीए लोकसेवा असा अभ्यासक्रम चालविला जातो. या परीक्षेसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. बुधवारपासून प्रथमवर्गाच्या परीक्षेला प्रारंभ झाला, तर येत्या २७ रोजी तृतीय वर्षाची परीक्षा होणार आहे. विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाईपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि परीक्षेवरही परिणाम झाला आहे. पुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासच करता आलेला नाही. तर ज्या विषयाची पुस्तके दिली गेली त्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मात्र बाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याने मुक्त विद्यापीठातील अनागोंदी कारभार समोर आला आहे.
मुक्त विद्यापीठात पुस्तकांचा घोळ
By admin | Updated: May 20, 2016 00:02 IST