शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलातील शौचालये खुली ठेवण्याचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:48 IST

अत्यंत कल्पक योजना म्हणून शहरातील हॉटेल्स महिलांना खुली करण्याचा प्रस्ताव देऊन पाठ थोपटून घेणाºया नाशिक महापालिकेची ही योजना म्हणजे मुळातच कायद्यातील तरतूद आहे. १८६७ साली ब्रिटिशांनी सराय अ‍ॅक्टमध्ये जी तरतूद केली, त्याचे महत्त्व आता समजू लागले आहे, हे विशेष होय.

नाशिक : अत्यंत कल्पक योजना म्हणून शहरातील हॉटेल्स महिलांना खुली करण्याचा प्रस्ताव देऊन पाठ थोपटून घेणाºया नाशिक महापालिकेची ही योजना म्हणजे मुळातच कायद्यातील तरतूद आहे. १८६७ साली ब्रिटिशांनी सराय अ‍ॅक्टमध्ये जी तरतूद केली, त्याचे महत्त्व आता समजू लागले आहे, हे विशेष होय.पंधरा दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने शहरातील हॉटेल्समधील शौचालये महिलांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जाहीर केले. एका हॉटेल्स संघटनेने त्यांना सकारात्मक प्रतिसाददेखील दिला. त्यानुसार हॉटेल्सच्या बाहेर शौचालये मोफत उपलब्ध असल्याचे फलक लावण्यात येणार असून, हॉटेलशी संबंध नसलेली कोणतीही महिला त्याचा वापर करणार असल्याचे नमूद करण्यात आले. हैदराबाद आणि दिल्लीनंतर अशाप्रकारचा निर्णय घेणारी महाराष्टÑातील पहिलीच महापालिका, असेही सांगण्यात आले. तसेच नाशिकचा आदर्श इतर शहरे कधी राबविणार, अशी पृच्छा करण्यात येत होती. तथापि, महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीदेखील अशाप्रकारची प्रसाधनगृहे आणि शौचालये खुली करणे कायद्याने बंधनकारक आहे आणि ही तरतूद ब्रिटिशकालीन आहे. ब्रिटिशांनी तयार केलेल्या सराय अ‍ॅक्ट १८६७ मध्ये हॉटेल्समधील स्वच्छतागृहे आणि पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारकच आहे. ज्या जागेचा प्रवासी किंवा यात्रेकरू शुल्क देऊन वापर करतात, अशी जागा म्हणजेच सराय! तेथे कोणतीही व्यक्ती आली तर तिला तेथील स्वच्छतागृह आणि पाण्याचा मुबलक वापर करू देणे बंधनकारक आहे. म्हणजे महिलाच नव्हे तर पुरुषांनादेखील ही सुविधा उपलब्ध आहे. पाणी तर केवळ माणसांनाच नव्हेतर ते जे पाळीव प्राणी आणतील त्यांनाही ही सुविधा देणे बंधनकारक असल्याचे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटिशांना १८६७ मध्ये जे कळले ते आज देशातील हैदराबाद, दिल्ली यांसारखी शहरे करत असून, त्यांचे बघून नाशिक महापालिका करीत आहे, हे विशेष होय. मुळात अशाप्रकारे स्वच्छतागृहे आणि पाणी सुविधा खुली करणे आवश्यक असूनही ती केली जात नसेल तर अशा हॉटेल्सवर कारवाई करण्याची गरज आहे, परंतु त्यांनी केवळ महापालिकेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला म्हणून हर्षोल्हासित होण्याची गरज काय, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.