शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

गोदाघाटावर बॉम्ब स्फोट

By admin | Updated: May 31, 2014 00:46 IST

अतिरेक्यांकडून बेछूटपणे गोळीबार

अतिरेक्यांकडून बेछूटपणे गोळीबारपंचवटी : वेळ सकाळी सव्वा अकरा वाजता, ठिकाण गाडगे महाराज पुलाजवळील म्हसोबा महाराज पटांगण, चार अतिरेक्यांनी गणेशवाडीतील भाजीमंडईच्या पायरीवर अचानकपणे बॉम्ब स्फोट घडवून आणला व गोळीबार सुरू केला. रस्त्याने येजा करणार्‍या भाविकांची आणि नागरीकांची पळापळ झाली त्यातच चेंगराचेंगरी घडली आणि काहींनी जीव वाचविण्यासाठी थेट नदीपात्रात उडया मारल्या. अतिरेक्यांनी केलेल्या हल्लयात अनेक जण जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडलेले होते. बघता क्षणी घटनास्थळी शेकडो पोलीस कर्मचारी, सुरक्षारक्षक, होमगार्ड आणि सायरन वाजवित रूग्णवाहिका व जिल्हा प्रशासन दाखल झाले. गंगाघाटावर अतिरेकी घुसल्याची चर्चा संपुर्ण शहरभर वार्‍यासारखी पसरली आणि शेकडो नागरीकांनी काय झाले हे बघण्यासाठी थेट गाडगे महाराज पटांगण गाठले आणि समोर सुरू असलेले मॉक ड्रिल बघून सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी गंगाघाटावरील गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या म्हसोबा महाराज पटांगणावर मॉक ड्रिल करण्यात आले. अचानकपणे अतिरेकी कारवाया झाल्या तर प्रशासनाने काय दखल घ्यावी, जखमींना मदतीसाठी काय करावे याचे धडे देण्यासाठी प्रात्यक्षिक करण्यात आले. तब्बल दिड तास चाललेल्या या मॉक ड्रिलमुळे अनेकांच्या मनात धास्ती भरली तर काहींनी बॉम्बस्फोट घडल्यानंतर काय परिस्थिती घडते हे मॉक ड्रिलच्या माध्यमातून अनुभवले. मॉक ड्रिलसाठी सकाळी आठ वाजेपासून पोलीस, जिल्हा प्रशासन, मनपा, रुग्णालय प्रशासन सज्ज झाले होते. बॉम्ब स्फोट व गोळीबाराची घटना घडल्यानंतर काय करावे याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. त्यात जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून प्रथमोपचार केंद्रात नेणे, नदीपात्रात पडलेल्यांना बाहेर काढणे, घटना ज्याठिकाणी घडली तेथिल परिसर संपुर्ण खाली करणे, सदर घटनेची माहीती नियंत्रण कक्षाला कळविणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समन्वय ठेवणे हे या मॉक ड्रिलमधून स्पष्ठ करण्यात आले. या मॉक ड्रिल प्रसंगी संचालक सचिव राज्य आपत्ती व्यवस्थापक आय. ए. कुंदन, जिल्हाधिकारी विलास पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सिंहस्थ अधिकारी महेश पाटील, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपआयुक्त अविनाश बारगळ, पंकज डहाणे, पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे, नरेंद्र पिंगळे, मनपाचे शहर अभियंता सुनिल खुने, आदिंसह मनपा आरोग्य विभाग, अग्निशामक दल, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, पोलीस, श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक सहभागी झाले होते. (वार्ताहर)