शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बम बम भोले...चा गजर : दर्शनासाठी मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:05 IST

श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत गंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

पंचवटी : श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत गंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.पहाटे मंदिरातील पुजारी यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती झाली. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्तर दरवाजाने प्रवेश देण्यात येऊन दक्षिण दरवाजाने बाहेर निघण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. मालवीय चौक, रामकुंड परिसरात पूजा साहित्य तसेच बेल-फूल विक्र ी करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती. श्रावण सोमवारचे औचित्य साधून धार्मिक संस्था तसेच सार्वजनिक मित्रमंडळाच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात होते. श्रावण मासातील शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी सकाळपासूनच मंदिराबाहेर रांगा लावलेल्या होत्या. पावसाने उघडीप दिली असल्याने दर्शनासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी दिसून आली. मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष केला.सोमेश्वरला भाविकांना सुलभ दर्शनचौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त सोमेश्वरला भाविकांनी दर्शन घेतले. गोकुळ अष्ट्मी आणि श्रावण सोमवार असा दुहेरी योग जुळून आल्यामुळे सकाळच्या सत्रात भाविकांनी गर्दी केली परंतु सायंकाळी गर्दी कमी झाल्याने भाविकांना दर्शन सुलभ झाले. सकाळी नाशिक मनपाचे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागातून सोमेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून गर्दी झाली होती. मात्र नंतर हळूहळू गर्दी कमीकमी होत गेली. रविवारची सुट्टी असल्याने बरेचशे भाविक सोमेश्वरला भेट देऊन गेले असल्याने त्या तुलनेने सोमवारी भाविकांची गर्दी कमी दिसली. मंदिर संस्थांनच्या वतीने आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले होते, गंगापूर पोलीस यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी नगरसेवक विलास शिंदे, भीमराव पाटील, बाळासाहेब लांबे, राहुल बर्वे, अविनाश पाटील, देवेंद्र भुतडा, सतीश मुजूमदार, हरिश्चंद्र मोगल, गोकुल पाटील, बापू गायकर, श्याम परदेशी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे