शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:41 IST

गेल्या चार-पाच वर्षांपासून गिरणारे परिसरातील खेड्यापाड्यांत कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे.

गिरणारे : गेल्या चार-पाच वर्षांपासून गिरणारे परिसरातील खेड्यापाड्यांत कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे.  गिरणारे परिसर पूर्णत: आदिवासी बहुल भाग असल्याने ना कोणती पदवी ना कुठली शाश्वती काही बोगस डॉक्टर ४-५ वर्षांपासून लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांनी स्थानिक व आदिवासी भागातील भोळ्याभाबड्या आदिवासी समाजाची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जीविताशीही खेळ चालविला जात आहे. अधिक रकमेच्या औषधी जास्त व सलाइन देऊन आदिवासींची फसवणूक करून हे लोक आपला खिसा भरत आहेत. या बिनडिग्री बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे कधी कधी रुग्णांना नाशिक येथे हलविण्याशिवाय पर्याय नसतो.  यंदाच्या उन्हाळ्यात अधिकच तपमान वाढल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अतिसार,  ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारखे  आजार दिसू लागले आहेत. काही भागांतील आदिवासींना दवाखान्यात येण्यासाठी हरसूल, त्र्यंबकेश्वर व गिरणारे लांब पडत असल्याने व कधी कधी वाहतूक सुविधा, आर्थिक परिस्थितीमुळे ते शहरात येण्याचे टाळतात.  परिणामी याचा फायदा या डॉक्टरांना होतो. ही लोकं जवळच्याच बोगस डॉक्टरकडून उपचार करून घेतात. परंतु या डॉक्टरांकडे कोणत्याच प्रकारची पदवी (डिग्री) किंवा उपचाराचे शास्त्रीय प्रशिक्षण नसतानाही ते सलाइन आणि जड इंजेक्शनचा वापर करून रु ग्णांची फसवणूक करीत आहे.अद्याप कारवाई नाहीया अगोदर याबाबत काही खेड्यातील नागरिकांनी अनेक तक्र ार केल्या. मात्र बोगस डॉक्टरवर थातूरमातूर कार्यवाही झाली. त्यांनी आपला बोगस व्यवसाय आजपर्यंत चालूच ठेवला आहे. यावर कुठे तरी अंकुश लावणे गरजेचे आहे. गिरणारे परिसरातील वाघेरा, वेळे, देवरगाव, रोहिला, हिरडी तसेच इतर गावांनाही याचा विळखा आहे. नागरिकांनी याविरोधात एकत्र येणे आवश्यक आहे.

टॅग्स :docterडॉक्टर