शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांनी ठोकले टाळे

By admin | Updated: March 21, 2017 00:12 IST

तपासणी मोहिमेचा धसका : मनपा मात्र कारवाईवर ठाम

नाशिक : महापालिकेने शहरातील रुग्णालये, क्लिनिक, दवाखाने तसेच सोनोग्राफी-गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केल्याने त्याचा धसका तथाकथित बोगस डॉक्टरांनी घेतला असून, अनेकांनी कारवाईच्या भीतीपोटी दवाखान्यांना टाळे ठोकत पलायन केले आहे. मात्र, महापालिकेने १५ एप्रिलनंतर संशयित बोगस डॉक्टरांविरुद्ध अचानक धडक मोहीम राबविण्याचे ठरविले असल्याने बोगस डॉक्टरांची पळताभुई थोडी होणार आहे. महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार दि. १५ एप्रिलपासून शहरातील रुग्णालये, दवाखाने तसेच सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रुग्णालयांचे नोंदणी प्रमाणपत्र, बाह्यरुग्ण रजिस्टरसह डॉक्टरांचे प्रमाणपत्र आदिंची तपासणी केली जात आहे. तपासणीत अनेक रुग्णालयांनी नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरणच केले नसल्याचे आढळून आले आहे. महापालिकेमार्फत सदर मोहीम राबविली जात असल्याने त्याचा धसका गल्लीबोळात दवाखाने थाटलेल्या तथाकथित बोगस डॉक्टरांनी घेतला आहे. या तपासणी मोहिमेमुळे अनेकांनी आपल्या दवाखान्यांना टाळे ठोकले असून, काहींनी तर बाहेर लावण्यात आलेले नामफलकही काढून ठेवले आहेत. मात्र, महापालिकेमार्फत सदर दवाखान्यांची तीनदा जाऊन तपासणी केली जाणार असून, महिनाभरात सदर दवाखाने बंद आढळून आल्यास त्यांची तपासणी १५ एप्रिलनंतर कधीही केव्हाही केली जाणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे. दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत ८७ क्लिनिक, ५७ रुग्णालये यांची तपासणी केली असून, २६ सोनोग्राफी सेंटर आणि १८ गर्भपात केंद्रांचीही तपासणी केली आहे. या तपासणीत उल्लंघन झाल्याचे आढळून आले नसल्याचे डॉ. डेकाटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)