शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

देवगावफाट्यावरील विहिरीत तरुण, तरुणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST

भरवसफाटा, कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र. ७ वरील देवगावफाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं. १८६ मधील विहिरीत दि.२९ रोजी ...

भरवसफाटा, कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र. ७ वरील देवगावफाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं. १८६ मधील विहिरीत दि.२९ रोजी सायंकाळी सहा ते सव्वासहा वाजेच्या सुमारास काळा टॉप, पिवळी लेगिन्स, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील २२ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दीड तासाच्या अंतराने सायंकाळी ७.५० वाजेच्या दरम्यान आणखी एका तरुणाचा मृतदेह फुगून वर आला. याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल डी.के. ठोंबरे, डी.डी. पानसरे, हवालदार कोते, किशोर, वाणी, मत्सागर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर तरुण व तरुणीने आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली हे अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

तरुणाची ओळख पटली

सदर विहिरीत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून, तो मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी आहे. सागर वेताळ असे त्याचे नाव असून, तरुणी निफाड येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दिवसभर विहिरीजवळ सदर तरुणाची मोटरसायकल उभी होती, मात्र नंतर ती त्याचे नातलग घेऊन गेल्याचे समजते.