शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्था महामंडळ : कार्यवाही थांबवण्याचे आवाहन

By admin | Updated: September 18, 2016 00:09 IST

शिक्षकांच्या समायोजनास न्यायालयाची स्थगिती

नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षक महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक समायोजन अध्यादेशाविरोधात दाखल केलेल्या हरकत अर्जावर गुरुवारी (दि. १५) झालेल्या सुनावणीत स्थगिती दिली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी (दि.२२) होणार आहे. तोपर्यंत राज्यभरातील समायोजनाची कार्यवाही स्थगित करण्याचे निर्देश न्यायालयाने शिक्षण विभागाला दिल्याची माहिती माजी केंद्रीयमंत्री तथा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील, विभागीय अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्रवक्ता बाळासाहेब पाटील व अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक स्तरावर समायोन प्रक्रियेसंदर्भात कोणतीही कार्यवाही करू नये, असे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. राज्यातील विविध शाळांमध्ये २०१२ पासून नियमाप्रमाणे नेमलेले शिक्षका मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो शिक्षकांना नेमणूक आदेश मिळून शिक्षणाधिकारी मान्यता देण्यासाठी अनेक सबबी शोधून टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित शिक्षकांना मान्यता द्याव्यात आणि त्यानंतरच रिक्त पदांचा आढावा घ्यावा, अशी मागणी यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. शिक्षकांच्या समायोजनाचा अधिकार व निर्णय शाळा व्यवस्थापनाचा आहे.