नाशिक : ब्लु टुथ स्पिकर दिले नाही, या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. यात एकास चाकूने दुखापत करण्यात आली तर एकास बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किशन राजेंद्र जगताप (25, रा. संतोषी माता नगर, सातपूर) याच्या फिर्यादीनुसार त्याच्या मित्राने संशियत सागर शिंगाडे याच्याकडे ब्लु टुथ स्पिकर मागितला. मात्र सागरने स्पिकर न देता वाद घातला किशन याच्यासह त्याच्या मित्रांना मारहाण केली. सागरने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला असता किशनचा भाऊ मध्ये पडला. मात्र त्याच्या पोटास चाकू लागल्याने गंभीर दुखापत झाली. तर सागर शिंगाडे याच्या फिर्यादीनुसार संशियत किसन जगताप, सनी घुले, किरण साबळे यांनी स्पिकर दिले नाही अशी कुरापत काढून सागरला बेदम मारहाण केली.
ब्ल्यु टुथ स्पीकर न दिल्याने दोन गटांत जुंपली; चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:14 IST
नाशिक : ब्लु टुथ स्पिकर दिले नाही, या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. यात एकास चाकूने दुखापत करण्यात आली तर एकास बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ब्ल्यु टुथ स्पीकर न दिल्याने दोन गटांत जुंपली; चाकूने वार
ठळक मुद्देकुरापत काढून सागरला बेदम मारहाण केली.