शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संसारवेलीवर कळी फुलण्याआधीच कोमेजली

By admin | Updated: February 2, 2017 01:50 IST

दुर्दैवी घटना : नाशिकरोड उड्डाणपुलावर अपघात

नाशिकरोड : संसाराची स्वप्ने रंगवत असताना व महिनाभरानंतर मेहंदीने हात रंगण्यापूर्वीच नाशिकरोडच्या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात सुरगाणा येथील लग्न ठरलेली युवती ठार झाली. या घटनेमुळे सुरगाणा भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरगाणा येथील रोहिणी मनोहर वाघमारे (२३) या युवतीचा चार-पाच महिन्यांपूर्वीच सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंप्री येथील प्रकाश ऊर्फ पंकज भगवान गांगवे यांच्याशी विवाह ठरून साखरपुडा झाला होता. महिनाभरानंतर मार्च महिन्यात त्या दोघांचा विवाह करण्याचे दोन्ही कुटुंबीयांकडून ठरले होते. बारगाव पिंप्री येथे राहणाऱ्या रोहिणीची मोठी बहीण वैशालीच्या नणंदचा विवाह असल्याने रोहिणी ज्यांच्यासोबत संसाराची स्वप्ने रंगवत होती त्या प्रकाश गांगवे यांच्यासोबत मोटारसायकल (एमएच १५, एफई ६०७७) वरून बुधवारी दीड वाजेच्या सुमारास नाशिकरोडहून सिन्नरच्या दिशेने उड्डाणपुलावरून जात असताना रेल्वे गेस्टहाउसच्या वरती पाठीमागून गॅस टाक्या वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रकने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रोहिणी ही गंभीर जखमी होऊन मयत झाली. तर प्रकाश हा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)