शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाचवर्षीय बालिकेचा अत्याचार करून खून

By admin | Updated: May 21, 2017 00:27 IST

आजीसह पित्यावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/वणी : दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी येथे पाचवर्षीय बालिकेवर जन्मदात्या पित्याने दारूच्या नशेत अत्याचार करून नात्याला काळिमा फासला. ही घटना उघड होऊ नये म्हणून आजीनेच नातीचा गळा दाबून खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान झोपेत आपल्या कुशीतून मुलीला उचलून नेत अत्याचार व खून केल्याचा बनाव आजीने रचला; मात्र पोलिसांनी काही तासात या घटनेचा पर्दाफाश करीत नराधम पिता व आजी यांना ताब्यात घेतले आहे.जवळके वणी येथे संशयित आरोपी सचिन अशोक शिंदे (२४) हा रात्री लग्नाच्या वरातीतून दारू पिऊन आला. त्याने आपल्या आईजवळ म्हणजेच पीडितेच्या आजी जवळ झोपलेली पोटच्या ५ वर्षीय मुलीला झोपेतच उचलून नेले व बाजूच्या खोलीत या चिमुरडीवर अत्याचार केला. सदर प्रकार आजी अनुसया हिच्या लक्षात आला. घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून तिने पीडित चिमुरडीची गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह जवळच असलेल्या शाळेच्या पाठीमागे फेकून दिला. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेह पुन्हा घरी आणला व चुलत भावास बोलावून पीडितेला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा बनाव केला. त्यानंतर आजी अनुसया अशोक शिंंदे (४८) हिने पोलिसांत धाव घेऊन कुणीतरी अज्ञात आरोपीने माझ्याजवळ झोपलेल्या पाचवर्षीय नातीला झोपेतून उचलून नेले व शाळेच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची बनावट फिर्याद दिली. या फिर्यादीवरून वणी पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२, ३७६ (१), २०९, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात श्वानपथकाने मृतदेह पडलेल्या ठिकाणापासून पीडित मुलीच्या घराचीच दिशा दाखवल्याने पोलीस तपासाला वेगळे वळण मिळाले. कळवणचे विभागीय पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी सचिन शिंदे याने केलेल्या कूकर्माची कबुली दिली. त्यानंतर संशयित आरोपी सचिन यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास कळवणचे विभागीय पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.एल. पवार करीत आहेत.पीडित मुलीच्या आई व वडिलांमध्ये वाद होऊन आई माहेरी राहत होती तर चिमुरडी वडील व आजीकडे राहत होती.