शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा भोसकून खून; जमावाचा पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: June 1, 2015 01:00 IST

तरुणाचा भोसकून खून; जमावाचा पोलिसांवर हल्ला

 नाशिक - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शैलेश दत्तात्रय सासे (२५) रा. भोई गल्ली या तरुणाचा एका टोळक्याने तीष्ण हात्याराने भोसकून निर्घून खून केल्याची घटना साठे चौकातील किटकॅट पॉइंट येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जिल्हा रूग्णालयात तोडफोड केली तर पोलिसांवरही हल्ला केला. या हल्लयात सहायक पोलीस उपायुक्त रविंद्र्र वाडेकर हेही जखमी झाले. घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार शैलेश सासे हा रात्रीच्या सुमारास किटकॅट पॉइंट येथे आला असतांना तरुणांच्या एका टोळक्याने शैलेश यास रागाने का पाहतोस असे म्हणत कुरापत काढली. यातून वाद वाढत गेला आणि या वादाचे पर्यावसन हाणामरीत झाले. या हाणामारीत टोळक्याने शैलेशवर तीष्ण हात्याराने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सदर घटना भोई गल्लीतील नागरिकांना समजताच जिल्हा रूग्णालयात मोठा जमाव चाल करून आला. त्यांनी जिल्हा रूग्णालयात तोडफोड करीत दगडफेक करीत काचा फोडल्या. यामध्ये आवारातील अनेक वाहनांचे नुकसान झाले. रूग्णालायातील आपतकालीन कक्षाचेही नुकसान झाले. रूग्णालयातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत रुग्णालयातील महत्वाचे कक्ष तातडीने बंद करून घेत स्टाफचाही बचाव केला. रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांवरही जमावाने दगडफेक केली. याचवेळी संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिस आले असता जमावाने पेव्हरब्लॉक आणि विटांनी पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये सहायक पोलीस उपायुक्त रविंद्र वाडेकर यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले. जिल्हा रूग्णालयात संतप्त जमाव उग्र झाला असतांनाच किटकॅट पॉइंट येथेही जमाव जमल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.