नाशिक : आरोग्य विभागाच्या ७ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवा यादीद्वारे जीवन अमृत सेवा (ब्लड आॅन कॉल) रक्तपुरवठा एका तासात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नाशिक जिल्'ात मालेगाव व नाशिक रुग्णालयांचा अपवाद वगळता जिल्'ातील सर्वच २४ ग्रामीण रुग्णालये आणि चार उपजिल्हा रुग्णालयात रक्तसाठाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शासन निर्णयानुसार जीवन अमृत सेवा पुरविण्यासाठी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर १०४ दूरध्वनी केला असता एका तासात चाळीस किलोमीटरच्या आत रक्तपुरवठा करणे बंधनकारक असल्याची शासकीय भाषेतील उत्तरे ऐकावयास मिळतात. ७ जानेवारीलाच आरोग्य विभागाने आरोग्य सेवांची माहिती सर्वसामान्यांना होण्यासाठी त्याबाबत प्रचार व प्रसार करण्याबाबत नवीन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार दहा आरोग्यसेवांची यादी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे
शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त पिशव्यांचा ठणठणाट शासन निर्णय कागदावरच, एका तासात रक्तपुरवठा
By admin | Updated: January 18, 2015 01:40 IST