शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात मालवाहतूक संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:26 IST

येवला : येथील मालवाहतूक संघटना, क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना व महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआरटीओ हे रोडवर बेकायदेशीर दंड वसूल करतात

येवला : येथील मालवाहतूक संघटना, क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना व महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सोमवारी सकाळी ११ वाजता सुधाकर पाटोळे, पोपटराव आहेर, अण्णासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली मालवाहतूक करणारे चालक रस्त्यावर उतरले. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक दुर्तफा ठप्प झाली होती. याप्रसंगी पाटोळे, आहेर, जावळे यांची भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात परेश परदेशी, रमेश मोहन, बबन मांजरे, राजू भागवत, गोरख शिंदे, बापू गवळी, देवा गवळी, अमजद पठाण, अनू भावसार, संदीप शिनगर, नवनाथ सांबरे, पांडू दराडे, संतोष पाबळे, दीपक पैठणकर, संजय जेजूरकर, असलम शहा, ज्ञानेश्वर सैद आदींसह चालक, मालक सहभागी झाले होते.या आहेत मागण्या...केंद्र सरकारने दीड वर्षापासून वाहनधारकांना कागदपत्राची माफी दिलेली असताना देखील आरटीओ हे रोडवर बेकायदेशीर दंड वसूल करतात व विनाकारण त्रास देतात, हे थांबवा. एसटी महामंडळ बेकायदेशीर मालवाहतूक करीत असूनदेखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कार्यवाही होत नाही. स्थानिक पोलीस सोडून बाहेरील पोलिसांचा अतोनात त्रास होतो, हे थांबवा. डिझेल व पेट्रोलच्या किमतीत होणारी भरमसाठ दरवाढ थांबवावी व दर कमी करावेत, पासिंगसाठी जुने दर ठेवण्यात यावे, टोल नाक्यावरील वाढलेले दर कमी करण्यात यावे, आदी मागण्या सदर निवदेनात करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीStrikeसंप