शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कांदा निर्यात बंदी विरुद्ध राष्ट्रवादीचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:56 IST

नाशिकरोड : केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव टोल नाका येथे मंगळवारी दुपारी मोदी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा निषेध: बेमुदत चक्का जामचा इशारा

नाशिकरोड : केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव टोल नाका येथे मंगळवारी दुपारी मोदी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे केंद्र शासनाने लागू केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले.केंद्र शासनाने कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळत असतानाच निर्यात बंदी केली. देशाचा जीडीपी मायनस २४ मध्ये गेला असताना कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेती उद्योगामुळे जीडीपी ला उभारी मिळणार होती ती देखील या निर्णयामुळे मिळणार नाही. सर्वसामान्य शेतकरी कोरोना परिस्थितीमध्ये देशोधडीला लागलेला आहे. थोडेफार उत्पन्न कांद्याच्या माध्यमातून त्यांना मिळणार होतं. परंतु केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यावरती मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नाशिक जिल्हा हा देशात एक नंबर कांदा उत्पादक असून नाशिक जिल्'ातील खासदारांनी लोकसभेचे अधिवेशनामध्ये कांदा निर्यात बंदी उठवावी याची आक्रमक भूमिका मांडली पाहिजे आणि तातडीने याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला पाहिजे. केंद्र शासनाने हा निर्णय शेतकर्यांवरती द्वेषभावनेने घेतला असून केंद्र शासनाने ताबडतोब हा निर्णय रद्द करावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. आंदोलनात रमेश औटे, मधुकर सातपुते, बाळासाहेब तुंगार,गणपत गायधनी, रामकृष्ण गायखे, स्वप्नील चुंबळे, संदीप ढेरे, विजू गांगुर्डे, शांताराम झोरे, सौरभ आहिरे, माणिकराव कडलक, प्रफुल्ल पवार, महेश शेळके, निखिल भागवत, मनोज गायधनी, श्रीकांत टावरे, वैभव झाडे, तुषार शिंदे, महेश रोकडे, सोनू ठोंबरे, सागर थेटे, आकाश भागवत आदी सहभागी झाले होते होते. 

 

टॅग्स :onionकांदाStrikeसंप