शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आढळल्या रिकाम्या गोण्या : नोटीस बजावणारबोगस खतांच्या

By admin | Updated: October 15, 2015 23:54 IST

संशयावरून आरईत छापा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून गुरुवारी (दि. १५) सायंकाळी भरारी व गुणवत्ता निरीक्षक पथकाने बागलाण तालुक्यातील आरई येथे एका खत विक्रेत्या दुकानावर छापा टाकला. छाप्यात विद्राव्य खतांच्या आठ रिकाम्या गोण्या आढळल्याने खत विक्रेत्यास याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बोगस खते बनविण्याच्या तक्रारीवरून छापा टाकण्यास गेलेल्या भरारी पथकाला रिकाम्या गोण्यांचा पंचनामा करण्याची वेळ आली. काल दुपारी कृषी विभागात याबाबतची तक्रार येताच जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे, जिल्हा मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी आरई (बागलाण) येथे जाण्याचा निर्णय घेतला. आरई येथे संतोष बोरसे नामक खते विक्रेत्याच्या दुकानात छापा टाकला असता तेथे पुणे येथील एका कंपनीच्या नावे नवीन कोऱ्या विद्राव्य खतांच्या आठ रिकाम्या गोण्या आढळल्या. या नवीन खतांच्या रिकाम्या गोण्या कशा? अशी विचारणा यावेळी पथकाने बोरसे यांच्याकडे केली. या दुकानात बोगस खते बनविण्यात येत असल्याचा कृषी विभागाच्या भरारी पथकाला संशय असून, खत विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस व कृषी अधिकारी सुनील विटनोर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)