शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काळी माती माझी आई, मजला देई अफाट पै!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST

पावसाच्या लंपडावामुळे भात नागलीची शेती फसवी झाली आहे. रोप तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत एकरी २५ ते ३० हजारांचा खर्च ...

पावसाच्या लंपडावामुळे भात नागलीची शेती फसवी झाली आहे. रोप तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत एकरी २५ ते ३० हजारांचा खर्च होतो. गेल्या अनेक वर्षांपासून पाऊस स्वच्छंदी झाल्याने भात नागली पिके हुकमी राहिलेली नाही. आदिवासी भागात वातावरण बदलामुळे फळबाग शेतीला पूरक स्थिती निर्माण झाल्याने हरणगाव येथील प्रयोगशील सुशिक्षित ( बीए व कृषी डिप्लोमा ) तरुण गणेश जाधव याने आपल्या शेतातील बखळ जागेत ७ वर्षांपूर्वी चिकूच्या कालीपती या वाणांच्या २० झाडांची लागवड करून सेंद्रिय खताची मात्रा दिली. ‘आरोग्यासाठी धरू ध्यास सेंद्रिय शेतीचा, टिकवून ठेऊ पोत आपल्या मातीचा’ या उक्तीने आपल्या घरच्या जनावरांचे शेणखत चिक्कूला वापरून शेतीचा पोत वाढविला. आठ महिन्यांमध्ये मला वीस झाडापासून आठ क्विंटल चिक्कूचे उत्पन्न मिळाले. दर आठ दिवसांच्या अंतराने दोन तीन क्रेटस् फळे तोडून कुठल्याही केमिकलचा वापर न करता घरीच पिकविला. चिक्कूत गोडी असून फळाची प्रत चांगली असल्याने कोणत्याही बाजारपेठेत विक्रीस न नेता जागेवरच एका किलोस ४५ ते ५० रुपये भावाने विकून चिक्कूने लखपती बनविले.

चिक्कू हे झाडाला उष्ण व कोरडे दमट हवामान पोषक असून रोगराईला बळी पडत नाही. पुढील काळात चिक्कूच्या

कालीपत्ती,घोलवड, पिलीपती, क्रिकेट बॉल या जातीची लागवड करण्याचा जाधव यांचा मानस आहे. ‘काळी माती माझी आई, मजला देई अफाट पै’ असे म्हणत आदिवासी तरुणाने प्रयोगशील बनून फळ शेतीकडे वळावे. जेणेकरून आपल्या कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल, असेही जाधव सांगतात.

कोट....

पारंपरिक शेतीने कधी पोट भरू दिले नाही. कर्जाच्या विवंचनेत आईबापाला सुखाची झोप नव्हती. चिक्कूने बापाचे डोक्यावरील कर्ज उतरविले .भाताने रडवले, चिक्कूने हसवले म्हणत आज त्यांच्या चेहऱ्यावर व घरात आनंद फुलविला. तालुक्यातील तरुणांनी उपजीविकेसाठी स्थलांतर न करता आपल्या मातीत राबवून फळ शेतीतून भरघोस उत्पन्न घ्यावे आणि आपल्या कुटुंबाला गरिबीच्या खाईतून वर काढावे.

- गणेश जाधव, युवा शेतकरी, हरणगाव

फोटो- २५हरणगाव जाधव

२५ गणेश जाधव

250921\25nsk_26_25092021_13.jpg~250921\25nsk_27_25092021_13.jpg

फोटो- २५हरणगाव जाधव~२५ गणेश जाधव