शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरच्या काळ्या मैनेला आला बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

आदिवासी बांधवांसाठी स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. चैत्र महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते ते आंबट गोड करवंदांचे. ...

आदिवासी बांधवांसाठी स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.

चैत्र महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते ते आंबट गोड करवंदांचे. डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंद घडोघड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात. या भागातील करवंदे मुंबई, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळेपासून तर जळगावपर्यंत पाठवली जातात. मात्र, हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाट्टेल त्या भावात करवंदे खरेदी करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेताना दिसून येत आहेत. तर लहान बालके व वृद्ध महिला पळसाच्या पानांचे द्रोण भरून दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून करवंद विक्री करत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.

करवंदापासून केले जाते लोणचे

आंब्याचा मोसम सुरू होण्यापूर्वीच करवंदाचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदापासून चांगल्या प्रतीचे लोणचे तयार करता येते. काही वर्षांपूर्वी या भागातील महिला बचत गटांनी करवंदापासून लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला होता. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने बाळसे धरण्यापूर्वीच हा उद्योग डबघाईस आला. आदिवासी बेरोजगार तरुण व महिलांना करवंदापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्रीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हक्काचा रोजगार मिळू शकतो.

फोटो - २९ करवंदे इगतपुरी

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात कच्च्या व पिकलेल्या करवंदांनी बहरलेल्या जाळ्या.

===Photopath===

290421\29nsk_32_29042021_13.jpg

===Caption===

फोटो - २९ करवंदे इगतपुरी  इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात कच्च्या व पिकलेल्या करवंदांनी बहरलेल्या जाळ्या.