शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शुभ्र फुलांनी बहरली डोंगरची काळी मैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:29 IST

पेठ : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदºयात बहरू लागली असून, या काळ्या मैनेला पांढºया फुलांचा बहर आला आहे. ऐन उन्हाळ्यात हा रानमेवा तयार होऊ पाहत असल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार आहे.

ठळक मुद्देरानमेवा । ऐन उन्हाळ्यात खवय्यांना मिळणार आस्वाद

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदºयात बहरू लागली असून, या काळ्या मैनेला पांढºया फुलांचा बहर आला आहे. ऐन उन्हाळ्यात हा रानमेवा तयार होऊ पाहत असल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार आहे.फाल्गुन महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते ते डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या करवंदाच्या फुलांचे. डोंगरावर सध्या पांढºया फुलांनी झाडे सर्वांना आकर्षित करीत असून, फुले गळून पडल्यावर हिरव्या रंगाचे करवंद घडेघड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो.आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करीत असतात. या भागातील करवंदे नाशिक, मालेगावपासूनतर जळगावपर्यंत पाठविली जातात, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाट्टेल त्या भावात करवंदे खरेदी करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेताना दिसून येतात. तर लहान बालके व वृद्ध महिला पळसाच्या पानांचे द्रोण भरून दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून करवंदे विक्र ी करतात.करवंदापासून करतात लोणचेआंब्याचा मोसम सुरू होण्यापुर्वीच करवंदाचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदापासून चांगल्या प्रतीचे लोणचे तयार करता येते. काही वर्षांपूर्वी सावर्णे येथील महिला बचतगटाने करवंदापासून लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला होता, मात्र पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने बाळसं धरण्यापूर्वीच हा उद्योग डबघाईस आला. आदिवासी बेरोजगार तरु ण व महिलांना करवंदापासून विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्र ीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हक्काचा रोजगार मिळू शकतो.

 

टॅग्स :Black Rainकाळा पाऊसkalwan-acकळवण