शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या कोटावर झळकली ‘लालफित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 17:09 IST

जिल्हा न्यायालयाच्या जुन्या बार लायब्ररीच्या जवळ वकिलांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरूष वकील उपस्थित होते.

ठळक मुद्देतीस हजारी न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा निषेधदिल्लीत घडलेली घटना लोकशाहीला काळीमा फासणारी

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात जिल्हाभरातील वकिलांनी एकत्र येत राज्याच्या बार कौन्सिलच्या पत्रानुसार आपल्या काळ्या रंगाच्या कोटावर ‘लालफित’ लावून नवी दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा बुधवारी (दि.६) सकाळी निषेध नोंदविला.दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून वकिलांवर करण्यात आलेल्या गोळीबार व मारहाणीची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलनेही या घटनेची निंदा करत राज्यभरातील वकिल संघटनांना पत्र पाठवून लालफित लावून कामकाज करण्याचे आवाहन केले. यानुसार नाशिक वकील संघाने बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील वकिलवर्गाने बुधवारी न्यायालयात एकत्र येत आपल्या काळ्या कोटाच्या बाहीवर लाल रंगाची फीत लावून निषेध नोंदविला. दिवसभर वकिलांनी अशाचपध्दतीने विविध खटल्यांमध्ये युक्तीवाद केला. जिल्हा न्यायालयाच्या जुन्या बार लायब्ररीच्या जवळ वकिलांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरूष वकील उपस्थित होते. नाशिक बार कौन्सिलचे अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण यांसह आदि वकील उपस्थित होते. यावेळी जायभावे म्हणाले, पोलीस आणि वकिलांमध्ये पार्किंगच्या विषयावरून वाद होतात. पोलिसांकडून अशाप्रकारे हल्ले यापुढे झाल्यास वकीलवर्गदेखील संघटितपणे कायदेशीर उत्तर दिले जाईल. दिल्लीत घडलेली घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. कोणीही कायदा हातात घेत आपले काम केले तर ते योग्य होणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्यानेच शिक्षा दिली जाईल.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयdelhiदिल्लीadvocateवकिल