शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गण राखण्यासाठी भाजपाची कसरत

By admin | Updated: February 4, 2017 01:00 IST

जायखेडा : सौभाग्यवतींसाठी नेत्यांकडून फिल्डिंग

 नितीन बोरसे  सटाणाबागलाणचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायखेडा गटात समाविष्ट असलेल्या जायखेडा गणात महिलाराज येणार आहे. कारण हा गण ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. माजी आमदारांसह विविध पक्षप्रमुख व दिग्गजांच्या भूमीत यंदाच्या निवडणुकीत अनेक इच्छुकांना महिला आरक्षणामुळे आपल्या सौभाग्यवतींसाठी मतांचा जोगवा मागावा लागणार आहे. दिग्गजांच्या या आखाड्यात भाजपाला आपला गण राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला गेल्या निवडणुकीत गेलेला गण मिळविण्यासाठी सक्षम रणरागिणीचा शोध घ्यावा लागत आहे. भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात होणाऱ्या लढतीत दिग्गज नेत्यांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.जिल्हा परिषद वा पंचायत समिती निवडणूक म्हटले की, पक्षापेक्षा व्यक्तीलाच पसंती दिली जाते. त्यामुळे पक्षीय पातळीवरदेखील इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या प्रभावी व्यक्तीला तिकिटासाठी पसंती देत असतात. त्यामुळे पक्षनिष्ठा याला फार अशी किंमत दिली जात नाही. या गणातदेखील अशाच पद्धतीने प्रत्येक पक्ष विचार करताना दिसून येत आहे. जायखेडा गण म्हटला की, बागायती क्षेत्र व श्रीमंत शेतकरी समोर येतो. शेतीबरोबरच राजकीयदृष्ट्यादेखील या परिसराचा दबदबा राहिला आहे. हा गण गेल्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित होता.मोसम खोरे हे एकेकाळी उसाचे आगार म्हणून ओळखले जात. त्यात जायखेडा गाव परिसर गुऱ्हाळासाठी प्रसिद्ध होते. हा गण मराठा व भिल्लबहुल असल्याने माजी आमदार दिलीप व उमाजी या बोरसे बंधूंबरोबरच मराठा समाजाचे उदाराम देवरे, कै. जयवंतराव सावंत, कै.बी.के. कापडणीस, भटू सावळा, नारायण कोर, देवा पवार, प्रा. जी.के. कापडणीस, विजय सावळा, कृष्णा भामरे यांचा दबदबा राहिला आहे. त्यांना अल्पसंख्याक समाजाचे सोमनाथ ब्राह्मणकर, भिला आत्माराम ब्राह्मणकर, दलित नेते पंडितराव मोरे यांची साथ लाभल्यामुळे सर्वाधिक काळ मराठा व भिल्ल समाजाने प्रतिनिधित्व केले. त्याची परतफेड म्हणून सन १९९१मध्ये बागलाण विकास आघाडीचे उमेदवार सोमनाथ ब्राह्मणकर यांना भरघोस मतांनी निवडून दिले.