शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मताधिक्याने राष्टÑवादीत धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:55 IST

लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने भाजपला ७२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर नक्कीच परिणामकारक ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने भाजपला ७२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर नक्कीच परिणामकारक ठरणार आहे. हे मताधिक्य भाजप-सेना युतीला बळ देणारे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या छातीत कळ निघणारे आहे. राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका व त्यांचे पती संजय या दाम्पत्याने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र जनतेने कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना नाकारले. हा निकाल मात्र चव्हाण यांच्यासाठी धोक्याचा इशारा असून, त्यांचे कट्टर विरोध माजी आमदार दिलीप बोरसे यांच्यासाठी मात्र सुखद धक्का देणारा आहे.बागलाणमध्ये गेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना २९ हजारांचे मताधिक्य होते. मात्र गेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत परिणामकारक ठरले नाही. गेल्या निवडणुकीत बागलाणचे प्रतिनिधित्व भाजपचे उमाजी बोरसे यांनी केले होते. मात्र अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका यांना आमदारकीची लॉटरी लागली आणि मोदी लाटेतही भाजपला पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण व संजय चव्हाण यांनी कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यातच माजी आमदार दिलीप बोरसे यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा घेतल्याने चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत डॉ. भामरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. सटाणा शहरासाठी केळझर पाणीपुरवठा योजना युतीच्या काळात मंजूर झाली. जलवाहिन्या खरेदी, अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामे करण्यात आली. त्याचा फायदा युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत तर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांची कसोटी लागणार आहे.तालुक्याच्या राजकीय समीकरणांकडे लक्षबागलाणमध्ये भाजपचे काँग्रेसीकरण झाल्याचे बघायला मिळत आहे. वास्तविक भाजपचे संघटनहे दुबळे आहे. मात्र मोदी करिष्म्यामुळे ते झाकले जात आहे. असे असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचेउमेदवार दिलीप बोरसे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, तोच फॉर्म्युलाया लोकसभा निवडणुकीत डॉ.भामरे यांच्या बाबतीत विरोधकांनीराबवल्याचे बघायला मिळाले. ऐन निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याचा प्रयत्न केला. काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयात राहून काँग्रेसच्या उमेदवाराचे नियोजन केल्याचे सांगितले जाते. काहींनी यंत्रणा खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. अशा दगाबाजांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेतात, यावरही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdhule-pcधुळे