शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेत भाजपाचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:30 IST

महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात पूर्णपणे भाजपाचाच वरचष्मा दिसून आला. शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह अनेक नगरसेवकांनी या मोहिमेकडे पाठ फिरविली तर कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसेच्या सदस्यांचीही अत्यल्प उपस्थिती दिसून आली. दरम्यान, शिवसेनेने या मोहिमेबाबत भाजपाला चिमटे काढले आहेत.

नाशिक : महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात पूर्णपणे भाजपाचाच वरचष्मा दिसून आला. शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह अनेक नगरसेवकांनी या मोहिमेकडे पाठ फिरविली तर कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसेच्या सदस्यांचीही अत्यल्प उपस्थिती दिसून आली. दरम्यान, शिवसेनेने या मोहिमेबाबत भाजपाला चिमटे काढले आहेत.  राज्य सरकारने २२ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत विशेष महास्वच्छता अभियान राबविण्याचा कार्यक्रम महापालिकेला दिला आहे. त्यानुसार, या अभियानाचा शुभारंभ शालिमार चौकात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाकडे शिवसेना पदाधिकाºयांसह नगरसेवकांनी पाठ फिरवली. भाजपाने सदर मोहीम ही पक्षविरहित असल्याचे जाहीर करत सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. निमंत्रण पत्रिकेतही शिवसेनेच्या खासदारांपासून आमदार, पक्ष पदाधिकाºयांची नावे टाकण्यात आली होती. परंतु, मुख्य कार्यक्रमापासून सेनेच्या सदस्यांनी दूर राहणेच पसंत केले. शहरात शुक्रवारी झालेल्या मोहिमेत भाजपाचेच नगरसेवक व कार्यकर्ते दिसून आले. त्यामुळे सदर मोहीम ही महापालिकेची की भाजपाची असा प्रश्नही अनेकांना पडला.  पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शालिमार चौकाप्रमाणेच उंटवाडी तसेच संभाजी स्टेडियम येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी, नियोजित वेळ सकाळची ९ वाजेची देण्यात आली होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या आगमनाला उशीर होत असल्याचे पाहून उपस्थित सेना नगरसेवकांनी सिडको प्रभागचे सभापती व सेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करून दिला. पालकमंत्री आले त्यावेळी सेना नगरसेवक नव्हते. कॉँग्रेस, राष्टÑवादी तसेच मनसेच्याही सदस्यांची अत्यल्प उपस्थिती दिसून आली.