शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना शह देण्यासाठी भाजपाची रणनीती

By admin | Updated: March 25, 2017 00:59 IST

नाशिक : अपक्ष व रिपाइंच्या सदस्यांची मोट बांधत विरोधकांनी स्थायी समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखल्याने भाजपाने आता विरोधकांना शह देण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे.

नाशिक : अपक्ष व रिपाइंच्या सदस्यांची मोट बांधत भाजपा विरोधकांनी स्थायी समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखल्याने पायाखालची वाळू घसरलेल्या भाजपाने आता विरोधकांना शह देण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे. सेनेसोबत रिपाइंची आघाडी होऊ नये, यासाठी भाजपाकडून शासन स्तरावरून विभागीय आयुक्तांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा असून, येत्या ३० मार्चला सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलविण्याचे नियोजन सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  भाजपाने महापालिकेत स्पष्ट बहुमत संपादन केले असले तरी अर्थकारणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची स्थायी समिती ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी चाल खेळली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे, कॉँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी एक अपक्ष आपल्या सोबत घेत एकत्रित गटनोंदणी केलेली आहे तर शिवसेनेने एकमेव निवडून आलेल्या रिपाइंसोबत आघाडी करण्यासाठी नोंदणी अर्ज विभागीय आयुक्तांकडे दिला आहे. सेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष व रिपाइं असे सारे विरोधक एकत्र आल्यास तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीवर भाजपाचे ८, सेनेचे ५, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे प्रत्येकी एक सदस्य जाऊ शकतील. त्यामुळे स्थायीवर समसमान बलाबल होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची वर्णी लागू शकेल. विरोधकांनी भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी ही चाल खेळली असतानाच सत्ता मिळूनही स्थायी हातातून जाण्याच्या भीतीने भाजपाची आता विरोधकांना शह देण्यासाठी भागम्भाग सुरू झाली आहे. भाजपातील थिंक टॅँकर्स जुने संदर्भ काढून कायद्याचा कीस काढण्यात व्यस्त आहेत. त्यातच शिवसेनेची रिपाइंसोबत आघाडी नोंदविली जाऊ नये यासाठी शासनस्तरावरून विभागीय आयुक्तांवरही दबाव आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे नोंदणीबाबत विचारणा केली असता त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)