शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भूमिका गुलदस्त्यात ठेवण्याची भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:09 IST

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने युती घोषित केली नाही, परंतु कोणाबरोबर राहायचेही घोषित केलेले नाही. शिवसेना उमेदवाराबरोबर काही मतदार तर काही थेट विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्याबरोबर असून, त्यामुळेच सोयीने निर्णय घेण्यासाठीच भाजपा भूमिका स्पष्ट करीत नसल्याचे वृत्त आहे.

नाशिक : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने युती घोषित केली नाही, परंतु कोणाबरोबर राहायचेही घोषित केलेले नाही. शिवसेना उमेदवाराबरोबर काही मतदार तर काही थेट विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्याबरोबर असून, त्यामुळेच सोयीने निर्णय घेण्यासाठीच भाजपा भूमिका स्पष्ट करीत नसल्याचे वृत्त आहे. विशेषत: सोमवारी (दि.७) भाजपा पदाधिकाऱ्यांबाबत परवेज कोकणी यांची बैठक झाल्याचे सांगण्यात येत असतानादेखील भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी याबाबत हात झटकले आहेत.विधान परिषदेसाठी शिवसेनेने राज्यातील सहापैकी तीन जागांवर संख्याबळानुसार उमेदवार देताना उर्वरित तीन मतदारसंघात काय करायचे याबाबत स्थानिक स्तरावर अधिकार दिल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.६) नाशिकमध्ये सांगितले. परंतु भाजपाने मात्र ज्या ठिकाणी उमेदवार नाही त्याठिकाणी काय करायचे याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे नरेंद्र दराडे अर्ज दाखल करत असताना त्यांच्या बरोबर भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण वगळता भाजपाचे कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते. पक्षाकडून आदेश नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास किंवा तत्पूर्वी दराडे यांनी बोलविलेल्या बैठकीस भाजपाच्या वतीने कोणीही उपस्थित नव्हते. त्यावेळीदेखील पक्षाकडून अधिकृतरीत्या सेनेच्या बैठकीस जाण्यास सांगण्यात आले नसल्याचे खुद्द बाळासाहेब सानप यांनीच सांगितले होते. दुसरीकडे पक्षात अलीकडेच आलेले जिल्हा बॅँकेचे संचालक परवेज कोकणी यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून भाजपा सदस्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे परवेज कोकणी हे भाजपा पुरस्कृत उमेदवार आहेत, काय हेदेखील स्पष्ट केले नसल्याने सामान्य मतदार सदस्यही सध्या संभ्रमात आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक