शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची भाजपाला धोबीपछाड

By admin | Updated: March 22, 2017 01:19 IST

नाशिक : महापालिकेत भाजपाने भलेही ६६ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी प्रमुख अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीची निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी दरवर्षी नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे.

नाशिक : महापालिकेत भाजपाने भलेही ६६ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी प्रमुख अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीची निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी दरवर्षी नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. सर्व विरोधी पक्षांनी उंटाची तिरकी चाल खेळत तीन अपक्ष व एक रिपाइं सदस्याच्या साथीने भाजपाला धोबीपछाड दिली आहे. स्थायी समितीवर १६ सदस्यांच्या रचनेत भाजपा ८ आणि सर्व विरोधक मिळून ८ असे समसमान बलाबल होऊन चिठ्ठी पद्धतीनेच सभापती विराजमान होणार आहे. महापालिकेत भाजपा ६६, शिवसेना ३५, कॉँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे ५, अपक्ष ३ आणि रिपाइं १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने भाजपाचाच महापौर व उपमहापौर विराजमान होऊ शकला. परंतु, महापालिकेत करारनाम्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती ताब्यात ठेवण्यास आता भाजपाला केवळ ‘राम’च वाचवू शकणार आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपाचा हा ब्लाइंड गेम केला आहे. प्रारंभी मनसेने अपक्ष सदस्य सय्यद मुशीर यांना सोबत घेत विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करून घेतली, त्यानंतर शिवसेनेने रिपाइंच्या एकमेव सदस्या दीक्षा लोंढे यांना सोबत घेत गटनोंदणी केली. त्यापाठोपाठ मंगळवारी (दि.२१) कॉँग्रेसने मूळच्या कॉँग्रेसीच असलेल्या विमल पाटील यांना आपल्या गटात बरोबर घेतले, तर राष्ट्रवादीने अपक्ष सदस्य गुरुमित बग्गा यांना सोबत घेत गटनोंदणी करून घेतली. त्यामुळे महापालिकेत आता कलम ३१ अ अन्वये तौलनिक संख्याबळानुसार भाजपा ६६, शिवसेना ३६, कॉँग्रेस ७, राष्ट्रवादी ७ आणि मनसे ६ असे बलाबल राहील. स्थायी समितीवर एकूण १६ सदस्य तौलनिक संख्याबळानुसार नियुक्त करायचे असतात. एक सदस्य नियुक्तीसाठी ७.६२५ असा कोटा आहे.