शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पुराव्यासोबतच चढणार भाजपाची पायरी

By admin | Updated: February 13, 2017 00:43 IST

भाजपाच्या उमेदवारांकडून दोन लाख रुपये घेण्याचा आणि उमेदवारीसंदर्भात दहा लाख रुपयांच्या मागणीसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...

नाशिक : भाजपाच्या उमेदवारांकडून दोन लाख रुपये घेण्याचा आणि उमेदवारीसंदर्भात दहा लाख रुपयांच्या मागणीसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, वसंत स्मृती येथे आचारसंहिता पथकाने धडक दिली, परंतु भाजपा नेत्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे हे पथक नमले. आता मात्र, व्हिडीओ आणि वृत्तपत्रातील या पक्षाच्या नाराजांचे देवाण-घेवाणीचे आरोप या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊन, हे पथक पुढील आठवड्यात पुन्हा पक्ष कार्यालयावर धडकणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीचे वाद प्रचंड गाजले. ऐन वेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देताना मोठे आर्थिक व्यवहार झाले, असे आरोप अनेक डावलल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यातच भाजपाच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात उमेदवारांकडून दोन-दोन लाख रुपये घेण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पाठोपाठ दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप करणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत, गेल्याच आठवड्यात आचारसंहिता कक्षाच्या पथकाने वसंत स्मृती या भाजपा कार्यालयावर धडक दिली होती, परंतु पक्षाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात तपासणीसंदर्भात काही लेखी आदेश असतील तर दाखवा, अशी भूमिका घेतल्याने पथकाला माघारी फिरावे लागले होते. त्यानंतर, लेखी पत्र घेऊन येतो, असे सांगणारे पथकाचे अधिकारी अद्याप फिरकलेले नाहीत.