शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीसाठी भाजपाचे मनसेपुढे लोटांगण

By admin | Updated: June 29, 2014 00:46 IST

स्थायीसाठी भाजपाचे मनसेपुढे लोटांगणो

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण नेपुढे लोटांगण घालत असल्याची शिवसेनेकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच भाजपाने आपली राष्ट्रीय पक्षाची इभ्रत जपावी, असा सल्लाही सेनेकडून दिला जात असल्याने सभापतिपदावरून राजकीय वातावरण तापले आहे. स्थायी समिती सभापतिपदाचा निर्णय सोमवारी (दि.३०) होणार असला तरी एकाही पक्षाने आपली भूमिका जाहीर न केल्याने सभापतिपदासाठीची चुरस वाढली आहे. त्यातच भाजपा आणि मनसेमध्ये झालेल्या अलिखित कराराचा मनसेला विसर पडल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून केला जात असल्याने मनसे-भाजपा युतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. करारानुसार सत्तेतील पाच वर्षांत पहिल्या व दुसऱ्या वर्षी मनसेला व त्यानंतर भाजपाला सभापतिपद दिले जावे, असे ठरले होते. त्यानुसार भाजपाने सभापतिपदाचा रेटा लावून धरला आहे. मात्र मनसेसह शिवसेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस व अपक्ष यांनीही सभापतिपदाचे अर्ज दाखल केल्याने मनसे-भाजपामध्येच तेढ निर्माण झाले आहे. सभापतिपदाचा वाढत असलेला गुंता लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली असून, भाजपाचे आमदार गिरीश महाजन व मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्यात सभापतिपदाबाबत चर्चा झाली. परंतु त्यातही भाजपाने आपली भूमिका कायम ठेवल्याने चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, या,सर्व घडामोडीत शिवसेनेने भाजपाला लक्ष केले असून, भाजपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असताना मनसेसारख्या पक्षापुढे लोटांगण घालणे ही बाब न पटणारी असल्याची टीका स्थानिक शिवसेना नेत्यांकडून केली जात असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत सर्व काही आलबेल असेलच, असे म्हणणे चुकीचे ठरेल. दरम्यान, भाजपाने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले असून, मनसेच्या पाठिंब्यासाठी स्थानिक मनसे नेत्यांची मनधरणी केली जात आहे. त्यातच कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही अर्ज भरल्याने चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)