शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
3
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
4
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
5
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
6
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
7
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
8
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
9
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
10
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
11
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
12
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
13
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
14
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
15
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
16
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
17
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
18
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
19
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
20
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

मनपा पोटनिवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले

By admin | Updated: August 30, 2016 00:19 IST

मनसे, रा.कॉँ.चा धुव्वा : शिवसेना, कॉँग्रेसची झुंज

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या दोन प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले. प्रभाग क्रमांक ३५ मध्ये मंदा ढिकले, तर प्रभाग ३६ मध्ये सुनंदा मोरे या दोन्ही भाजपा उमेदवारांनी विजयाला गवसणी घातली. महापालिकेत सत्तारूढ मनसेच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही जागा भाजपाने आपल्या ताब्यात घेतल्या. निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला, तर शिवसेना व कॉँग्रेस उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर कडवी लढत दिली. मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी मतदान केल्याने मनसेच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी दोघांचे सदस्यत्व रद्द ठरविले होते. या दोहोंच्या रिक्त जागांसाठी रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. प्रभाग ३५ मध्ये ४७.७० टक्के तर प्रभाग ३६ मध्ये ५६.६२ टक्के मतदान झाले होते. दोन्ही प्रभागांची मतमोजणी सोमवारी (दि.२९) झाली. यावेळी प्रभाग ३५ मध्ये भाजपाच्या उमेदवार मंदा ढिकले या १९८ मताधिक्याने, तर प्रभाग ३६ मध्ये भाजपाच्याच सुनंदा मोरे या ४९१ मताधिक्याने निवडून आल्या. प्रभाग ३५ मध्ये मंदा ढिकले यांना १९४६, सेनेच्या वृषाली नाठे यांना १७४८, मनसेच्या शांताबाई शेजवळ यांना ९९१, तर राष्ट्रवादीच्या वंदना चाळीसगावकर यांना २६७ मते पडली. प्रभाग ३६ मध्ये भाजपाच्या सुनंदा मोरे यांना १९३७, कॉँग्रेसचे शशिकांत उन्हवणे यांना १४४६, सेनेचे सुनील शेलार (१३९७) आणि मनसेचे प्रवीण पवार यांना ७२० याप्रमाणे मते मिळाली. दोन्ही प्रभागांत १४२ मतदारांनी कुणाही उमेदवाराला पसंती दर्शविली नाही. भाजपाने मिळविलेला हा विजय फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयाची नांदी मानली जात असल्याने भाजपामध्ये उत्साहाला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)