शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आंतरराष्ट्रीय टेक आॅफ !

By admin | Updated: February 10, 2017 23:57 IST

अहो आश्चर्यम् : म्हणे महापालिकेत सत्ता आल्यास विमानसेवा सुरू करणार

 संजय पाठक नाशिकशहरातील केरकचरा संकलनासाठी असलेली घंटागाडी सेवा अनियमित असल्याची तक्रार करीत नागरिक थकले असताना महापालिकेत सत्ता आल्यास केवळ शहर बस सेवाच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची भरारी भाजपाच्या ध्येयनाम्यात घेण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने ध्येयनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात अशाप्रकारची कल्पक भरारी मांडण्यात आली आहे.नाशिक शहरानजीक ओझर येथे नागरी हवाई सेवेसाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने २०१४ मध्ये विमानतळ बांधले. ते एचएएलकडे हस्तांतरित केले. त्यानंतर भाजपाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यापासून स्थानिक खासदार हेमंत गोडसे यांनी आजवर येथून विमान सुरू करण्यासंदर्भात अनेक आश्वासने दिलीत, परंतु राष्ट्रीय सोडाच नाशिक - मुंबई किंवा नाशिक-पुणे सुद्धा सेवा व्यवहार्य ठरलेली नाही, अशा स्थितीत भाजपाने महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सुरू करण्याचे जाहीर करून धक्का दिला आहे. विशेष म्हणजे याच जाहीरनाम्यात घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणार असे जाहीर करून भाजपाने शहरातील ही सेवाही धड नसल्याचे मान्य केले आहे. याशिवाय राज्य परिवहन महामंडळ सव्वाशे कोटींचा तोटा झाला म्हणून जी शहर बस वाहतूक महापालिकेच्या गळ्यात टाकण्याच्या तयारीत आहे ती शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्याचे ध्येय (?) भाजपाने ठेवले असून, पालिकेला आणखी गाळात घालण्याची तयारी सुरू केली आहे.नाशिक शहराच्या भविष्यकालीन पाणीपुरवठ्यासाठी त्र्यंबक तालुक्यातील बेजे येथे किकवी धरण बांधण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळातच झाला आहे. ते धरण बांधण्याच्या निविदाही आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आल्या, परंतु सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली भाजपा सरकारनेच त्या निविदा गेल्या वर्षी रद्द केल्या असून, त्यामुळे धरणाचे कामही रखडले आहे. परंतु भाजपाने नवीन धरण बांधण्याचेही ध्येय ठेवले आहे. विशेष म्हणजे हे धरण नाशिककरांसाठी बांधणार की, कथित समन्यायी धोरणाच्या नावाखाली नगर-औरंगाबादसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.