शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

सांगलीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:17 IST

नाशिक- सांगली महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना आठ नगरसेवक फुटले आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यामुळे अशा प्रकारे नाशिक महापालिकेची तिजोरी ...

नाशिक- सांगली महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना आठ नगरसेवक फुटले आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यामुळे अशा प्रकारे नाशिक महापालिकेची तिजोरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी भाजपाने खेळी केली आणि पक्षातील निष्ठावंतांना संधी दिली. सभापतीपदाची निवडणूक संपल्यानंतर यातील किमान दाेन सदस्य राजीनामा देतील आणि त्या जागी नवीन सदस्य नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. २४) विशेष महासभा बेालवली हेाती. यात खरे तर आठ सदस्यांची नियुक्ती करणे अपेक्षित असताना सोळा सदस्यांची नव्याने घोषणा करण्यात आली. त्यात भाजपाकडून दाेन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या गणेश गीते यांना पक्षाने पुन्हा संधी देऊन सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची व्यूहरचना केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. गीते यांना संधी देण्यामागे तेच स्थायी समिती भाजपच्या हातून जाऊ देणार नाही, अशी खात्री करून त्यांनाच सभापती करणार असल्याचे जणू संकेत देण्यात आले आहेत. तर पक्षाकडून अनेक ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक असताना डावा उजवा निर्णय घेतल्याचा आरोप होऊ शकतो. त्यातच सभापतीपदासाठी उमेदवार दिल्यानंतर असंतुष्ट गटाचा फटका बसू शकतो, याचा विचार करून पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी हिमगौरी आडके आणि रंजना भानसी या केवळ हंगामी सदस्य आहेत. सभापती पदाची निवडणूक संपली की पक्षातील ज्या नगरसेवकांना संधी द्यायची आहे, त्यांना ती मिळावी, यासाठी या देाघी राजीनामा देऊन जागा मोकळी करून देणार असल्याचेदेखील सांगण्यात येत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडे अनेक इच्छुक आले आणि त्यांना पक्षाने संधी दिली; मात्र राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर अनेकांना परतीचे वेग लागले आहेत. अशावेळी समितीने संधी दिल्यानंतरदेखील ते भाजपच्या बाजूने उभे राहतील, याची खात्री नसल्याने ‘जाणाऱ्यांमुळे’ तरी स्थायी समितीची सत्ता हातून जाऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. आमदार सीमा हिरे यांच्या मतदार संघातील असलेल्या आणि नसलेल्या योगेश हिरे यांच्यासह साऱ्यांना संधी देतानाच आमदार देवयानी फरांदे यांच्या सूचनेनुसार दोन नवीन सदस्य हंगामी सदस्यांचे राजीनामे घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एक सदस्य तर नवे शहर प्रभारी जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय असून, त्यामुळे रावल यांनीही महापालिकेत यानिमित्ताने आपल्या निकटवर्तीयांचे खाते खोलले आहे.

इन्फो..

निवडणुकीचे वर्ष असल्याने भाजपात फाटाफुट होणार आहेच, विशेषत: अन्य पक्षातून आलेला एक गट मार्गस्थ हाेण्याच्या तयारीत आहे; परंतु त्यांनादेखील यानिमित्ताने पक्षाने संदेश देऊन टाकला आहे, तर पक्षातील निष्ठावान मात्र या निर्णयाचे स्वागत करताना पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून आहे. अरुण पवार यांच्यासारख्यानेदेखील नाराजी व्यक्त न करता पक्षाचे आदेश मान्य, एवढीच प्रतिक्रिया नेांदवली आहे.

इन्फो...

भाजपचे सदस्य सहलीवर...

स्थायी समितीची फेररचना केल्यानंतर पक्षाचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. खरे तर विद्यमान समितीच्या सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत असून, त्यानंतर नूतन सभापती पदाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला जाईल. ते निवडणूक कार्यक्रम घोेषित करतील; परंतु त्याची प्रतीक्षा न करताचा भाजपने तटबंदीसाठी आपले बहुतांश सदस्य रवाना केले आहेत.