शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शासननिर्णयाप्रमाणे कामे करण्याची भाजपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

येवला : महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन येवला : महावितरणने शासननिर्णयाप्रमाणे नवीन कृषीपंप वीज जोडणी, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे ...

येवला : महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन

येवला : महावितरणने शासननिर्णयाप्रमाणे नवीन कृषीपंप वीज जोडणी, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे बळकटीकरण व इतर अनुषंगिक कामे करावीत, अशी मागणी भाजपच्यावतीने एका निवेदनाद्वारे उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. शासननिर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. येवला कार्यालयाची एकूण वसुली रक्कम अंदाजे ५ कोटींच्या घरात असून सदर योजनेच्या ३३ टक्के रक्कम ही १.८ कोटींच्या घरात आहे. सदरची रक्कम शासननिर्णयाप्रमाणे कृषीपंप वीज जोडणी, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे बळकटीकरण व इतर अनुषंगिक कामांना वापरणे अपेक्षित होते; परंतु महावितरण व संबंधित कामांचे ठेकेदार हे शेतकऱ्यांकडून रकमा वसूल करत असल्याने सदर बाब शेतकरी व ग्राहकांवर अन्याय करणारी आहे. शासन शासननिर्णयाप्रमाणे कामे न झाल्यास भाजपच्यावतीने जनआंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, आनंद शिदे, नानासाहेब लहरे, संतोष काटे, महेशकुमार पाटील, बाळासाहेब शिंदे, सुधाकर पाटोळे, रोहित मढवई, किरण लभडे, चेतन धसे, नामदेव शिंदे, संजय जाधव, सुनील घिगे, शिवराम डोंगरे, सागर नाइकवाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

फाेटो- ०९ येवला बीजेपी

येवला येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी.

090821\565709nsk_49_09082021_13.jpg

फाेटो- ०९ येवला बीजेपी येवला येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांना निवेदन देताना भाजपाचे पदाधिकारी.