शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेगळा विदर्भ हा भाजपाचाच अजेंडा

By admin | Updated: May 28, 2015 00:07 IST

शहांच्या विधानाचे भातखळकरांकडून खंडन

नाशिक : वेगळा विदर्भ हा पहिल्यापासूनच भाजपाचा अजेंडा राहिला असून, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केलेले विधान हे वैयक्तिक आहे. विधानसभेत सर्व मताने यावर निर्णय झाल्यास वेगळे विदर्भ राज्य प्रत्यक्षात येईल, असे मत प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले. गेल्या दोन दिवसांपासून वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून शहा विरुद्ध राज्यातील नेते असा सामना बघावयास मिळत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘भाजपाने स्वतंत्र विदर्भाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते’ असे सांगत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा नेहमीच रेटून नेणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धोबीपछाड दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहा यांच्या विधानाचे खंडन करीत आम्ही नेहमीच वेगळ्या विदर्भासाठी आग्रही असल्याचे सांगितले होते. त्यावर नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या भातखळकर यांनीही दानवे यांच्याच सुरात सूर मिसळत शहा यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगत या विसंवादाला आणखी बळकटी दिली. यावेळी भातखळकर म्हणाले की, १९९५ मध्ये जेव्हा एनडीए सरकार सत्तेत होते तेव्हा छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड या तीन नव्या राज्यांना मंजुरी दिली होती. त्यावेळेस विधानसभेने एकमताने निर्णय घ्यावा हे सूत्र अवलंबविले होते. हेच सूत्र राज्य शासनाने अवलंबविल्यास वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, देशभर राबविल्या जाणाऱ्या जनकल्याण पर्वाबाबत बोलताना त्यांनी मोदी सरकार भ्रष्टाचारमुक्त व गतिमान प्रशासन देणारे सरकार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)